Agriculture news in Marathi Chance of light rain in the state | Agrowon

राज्यात हलक्या पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 सप्टेंबर 2021

राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १६) कोकणात बहुतांशी ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १६) कोकणात बहुतांशी ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, अमरेली, बडोदा, शाजापूर, ठळक कमी दाब क्षेत्र, अंबिकापूर, बालासोर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तर मॉन्सूनच्या आसाला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरात, पश्चिम बंगालपर्यंत कायम आहे. राज्यात पाऊस ओसरला असून, अनेक भागात पावसाने उघडिप दिली आहे. बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग) :

कोकण : पालघर : डहाणू २२, जव्हार २७, तलासरी २५.
रत्नागिरी : संगमेश्वर ४०, सिंधुदुर्ग : सावंतवाडी २०. ठाणे : उल्हासनगर २८.

मध्य महाराष्ट्र :
धुळे : गिधाडे ३१.
कोल्हापूर : गगणबावडा २२.
नाशिक : इगतपुरी २३.
सातारा : महाबळेश्वर ४८.

विदर्भ : अमरावती : अंजणगाव २३, धारणी २९, वरूड ३०, भंडारा : साकोली २२. गडचिरोली : कोर्ची ५३. गोंदिया : आमगाव २७, अर्जुनीमोरगाव २४, देवरी ४३, गोंदिया ३४, गोरेगाव २२, सालकेसा २४. नागपूर : कुही २२, मौदा २२, नरखेडा ३३, सावनेर २४.

ठळक कमी दाब क्षेत्र निवळतेय
आग्नेय मध्य प्रदेश व परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र असून, ही प्रणाली कमजोर होत आहे. गुजरातवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
संघर्षातून फुलले शेतीमध्ये 'नवजीवन'अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी...
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
विदर्भ, मराठवाड्यात उद्यापासून पावसाची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण...
सूक्ष्म सिंचन अनुदानात वाढपुणे ः केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन...
मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
भाजपच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने...मुंबई ः या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे...
‘कथनी आणि करणी’त फरक पुन्हा उघडपुणे : आधीच अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या...
बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीन विक्री करापुणे : सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
लातुरात सोयाबीनच्या भावात तीनशेची घसरणलातूर ः खाद्यतेल आयात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर...
आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक...मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
मॉन्सूनचा महाराष्ट्रातून निरोपपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...