Agriculture news in Marathi Chance of light rain for a week in the state | Page 2 ||| Agrowon

राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. येत्या पाच ते सहा दिवस राज्यात तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे.

पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. येत्या पाच ते सहा दिवस राज्यात तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पावसामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. कमाल तापपानाबरोबर किमान तापमानात बऱ्यापैकी घट झाली आहे. त्यामुळे उकाडा कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात काही प्रमाणात ऊन पडत आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका नागी. सोमवारी (ता. २१) सकाळच्या आठ वाजेपर्यंत विदर्भातील ब्रम्हपुरी येथे ३५.८ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. सध्या बहुतांशी भागात तापमान हे सरासरीएवढे आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातही पारा कमीच आहे. विदर्भात कमाल तापमानात २९ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही ३३ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात तापमान २० ते ३५ अंश, तर कोकणात ३१ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

कोकणात पावसाची उसंत
कोकणात जवळपास आठवडाभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रविवारपासून जोर ओसरला आहे. सोमवारी (ता. २१) कोकणासह मध्य महाराष्ट्रातील पावसाने चांगलीच उसंत दिली आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे नद्यांतील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. वाढलेल्या पाणीपातळीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. खानदेश, मराठवाडा व विदर्भात दिवसभर ऊन्हासह काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. 

राज्यात सोमवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस, मिलिमीटर : स्त्रोत - हवामान विभाग 
कोकण : जव्हार ३५, माणगाव ३८, म्हसळा ४७, मुरूड ६३, रोहा ३०, श्रीवर्धन ६६, सुधागडपाली ३०, तळा ६३, उरण ६७, देवगड ४६, दोडामार्ग ५३, कणकवली ४८, ठाणे ३६.

या जिल्ह्यांमध्ये होणार जोरदार पाऊस  
बुधवार ः भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया
गुरुवार ः भंडारा,नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया


इतर बातम्या
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...