विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची शक्यता 

झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि तेलंगाणादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. यामुळे विदर्भात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे आहे.
Chance of pre-monsoon rains with thunderstorms in Vidarbha
Chance of pre-monsoon rains with thunderstorms in Vidarbha

पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि तेलंगाणादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. यामुळे विदर्भात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे आहे. 

येत्या बुधवारपासून (ता. २१) विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जना, वादळ व विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

देशात एक मार्चपासून पूर्वमोसमी पावसासाठी पोषक स्थिती बनत असल्याने वातावरणात चांगलेच बदल होत आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाचे मळभ दूर झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यामुळे कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. रविवारी (ता. १८) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. 

राज्यात पुणे, कोल्हापूर, महाबळेश्‍वर, नाशिक, सांगली, सोलापूर,  मुंबई या भागात कमाल तापमान हे सरासरीएवढे होते. मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांत कमाल तापमान हे सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत घट झालेली होती. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही काही भागात किंचित घट झालेली आहे. पुणे येथे सर्वांत कमी १७.९ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. 

गेल्या दोन दिवसांपासून बिहार आणि परिसर व झारखंड परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच पंबाज व परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि २.१ किलोमीटर उंचीवर आहे. उत्तरेकडील पूर्व उत्तर प्रदेशाच्या परिसर, आसामचा मध्य भाग व परिसर आणि दक्षिणेकडील केरळ व परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे विदर्भातील वातावरणात वेगाने बदल होऊ लागले आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com