कोकणात पावसाची शक्यता

राज्यात मेघगर्जना, विजांसह पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ५) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Chance of rain in Konkan
Chance of rain in Konkan

पुणे : राज्यात मेघगर्जना, विजांसह पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ५) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

ओमानकडे गेलेले ‘शाहीन’ चक्रीवादळ निवळत आहे. तर बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. या भागात चक्राकार वारे वाहत आहेत. तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून लक्षद्वीप बेटांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. तसेच केरळच्या किनाऱ्यालगतच्या अरबी समुद्रातही चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालींमुळे कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

बुधवारपासून मॉन्सूनचा परतीचा प्रवास शक्य नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाचा मुहूर्त यंदा लांबला आहे. देशाच्या वायव्य भागातून मॉन्सून परतण्यासाठी पोषक हवामान होत आहे. बुधवार पासून (ता. ६) मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग. विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कोकण : रायगड. मध्य महाराष्ट्र : जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर. मराठवाडा : औरंगाबाद, जालना. विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com