कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने अनेक ठिकाणी तापमान तिशीपार गेले आहे. यातच अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे.
Chance of rain in Konkan, Central Maharashtra
Chance of rain in Konkan, Central Maharashtra

पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने अनेक ठिकाणी तापमान तिशीपार गेले आहे. यातच अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २२) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

शुक्रवारी (ता. २१) उत्तर प्रदेशातील कानपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे २१ ते २३ जानेवारी दरम्यान उत्तरेकडील राज्यामध्ये विजासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. यातच दक्षिणेकडील राज्यांमध्ये आज (ता. २२) ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसाचा हंगाम संपणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  

उत्तर अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २२) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात, तर उद्या (ता. २३) दक्षिण कोकणात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 

शुक्रवारी (ता. २१) धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी ९.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भापाठोपाठ आता मराठवाड्यातही काही ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांवर गेले आहे. 

शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.८ (११.१), धुळे ३२ (९.८), जळगाव ३० (१३.४), कोल्हापूर ३२.८ (१६.६), महाबळेश्‍वर २६.६ (१४.४), मालेगाव २९ (१३.४), नाशिक २९.१ (१२.३), निफाड २८.६ (१०), सांगली ३३.२ (१४.५), सातारा ३१.५(१५.६), सोलापूर ३३.४ (१५.१), सांताक्रूझ ३०.६ (१८.५), अलिबाग २७.२ (१७.९), डहाणू २८.७ (१८.६), रत्नागिरी ३०.८ (१६.६), औरंगाबाद ३१.८ (१६), नांदेड ३१ (१५.६), उस्मानाबाद ३०.१ (१६), परभणी ३१.४ (१६.७), अकोला ३१.७ (१६), अमरावती ३० (१२), बुलडाणा २९ (१७), ब्रह्मपुरी ३०.८ (१४), चंद्रपूर २८ (१४.६), गडचिरोली २९ (१२), गोंदिया २८ (१०.८), नागपूर २९.२ (१२.६), वर्धा ३०.५ (१३.५), वाशीम ३१.५ (१३), यवतमाळ २९.५ (१५).

या जिल्ह्यात पावसाची शक्यता  कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी.  मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com