Agriculture news in Marathi Chance of rain in Konkan, Vidarbha | Page 4 ||| Agrowon

कोकण, विदर्भात पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 सप्टेंबर 2021

राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १८) कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी, तर उर्वरित राज्यात मुख्यत: उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १८) कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी, तर उर्वरित राज्यात मुख्यत: उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम असून, फालोदी, अजमेर, ठळक कमी दाब क्षेत्र, जमशेदपूर, दिघा ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून गुजरात, पूर्व राजस्थान ते ठळक कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

राज्यात दोन तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पावसाच्या उघडिपीमुळे उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. उद्यापासून (ता. १८) पावसाला पोषक हवामान होत असून, रविवारपासून (ता. १९) विदर्भासह राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.   शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. 

राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग)  
कोकण :
देवगड, दोडामार्ग, पेडणे, ठाणे, उल्हासनगर प्रत्येकी १०. 
मध्य महाराष्ट्र : तळोदा १०.
विदर्भ : देवरी, कोर्ची, सालकेसा प्रत्येकी ४०, अर्जूनी मोरगाव, देसाईगंज, कुरखेडा, लाखंदूर, नागभीड, नागपूर, सडक अर्जूनी, साकोली प्रत्येकी ३०. बाभूळगाव, चांदूरबाजार, चिखलदरा, गोरेगाव, करंजालाड, लाखनी, मोर्शी प्रत्येकी २०.

कमी दाबाचे क्षेत्र निवळण्याचे संकेत
वायव्य मध्य प्रदेश आणि नैर्ऋत्य उत्तर प्रदेशात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, उद्या (ता. १८) ही प्रणाली निवळण्याची शक्यता आहे. म्यानमारच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, उद्या ही प्रणाली ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत.


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात पाणीपातळीत वाढजळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या...
सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामात तीन लाख...सोलापूर ः जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे....
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप...जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
ओल्या दुष्काळाची घोषणा करा अकोला : विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणांतून विसर्ग बंदपुणे : परतीचा पाऊस राज्यातून परतल्याने पावसाने...
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार :...नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ...
सरकार साखर उद्योगासह ऊस उत्पादकांच्या...सोलापूर ः ‘‘साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे....
सोलापूर जिल्ह्यात ऊसबिलाची थकबाकी मिळेनासोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामाला सुरवात...
आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी लवकर...नाशिक : ‘‘शेतकरी असो वा शेतमजूर यांची प्रगती कशी...
खानदेशात पावसाने सोयाबीन, कापसाचे नुकसानजळगाव: खानदेशात अनेक भागात शनिवारी (ता. १६)...
जळगाव : वाघूर प्रकल्पग्रस्तांना...शेंदुर्णी, जि. जळगाव : वाघूर प्रकल्पासाठी २००५...
जालना बांबू लागवडीचे देशातील मोठे...जालना : ‘‘उद्योजकांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद...
सिंधुदुर्गमध्ये सरासरीच्या ९० टक्के... सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आतापर्यंत ४०५२ मिमी...
वाहतुकदारांच्या समस्या सोडविणार :... मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या...