कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता

किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे आज (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे.
Chance of rain with lightning in Konkan, Central Maharashtra
Chance of rain with lightning in Konkan, Central Maharashtra

पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे आज (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्याही खाली आले आहे. सोमवारी (ता. २९) पुणे येथे नीचांकी १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राचे संकेत अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीलगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उद्यापर्यंत (ता. १) महाराष्ट्राचा किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तसेच दक्षिण अंदमान समुद्रात आज (ता. ३०) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्चिम आणि वायव्य दिशेकडे येताना या प्रणालीची अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :   कोकण : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.५ (१२.४), नगर - (१४.८), जळगाव ३०.८ (१३.७), कोल्हापूर २९.७ (१९.९), महाबळेश्वर २२.६(१४.६), मालेगाव - (१४.३), नाशिक २८.७ (१२.९), निफाड २८.३ (१७.२), सांगली ३०.८(२०.६), सातारा २९.३(१७.९), सोलापूर ३१.९ (१७.२), सांताक्रूझ ३३.६(२०.०), डहाणू ३३.९ (१९.५), रत्नागिरी ३४.२ (२२.४), औरंगाबाद २९.२ (१३.२), नांदेड ३३.२ (१७.६), परभणी २९.० (१५.०), अकोला ३१.६ (१६.१), अमरावती ३०.४ (१४.५), ब्रह्मपुरी ३२.९ (१४.२), बुलडाणा ३०.२ (१५.२), चंद्रपूर ३१.६ (१४.४), गडचिरोली २९.०(१५.०), गोंदिया ३०.५ (१२.५), नागपूर ३०.२ (१३.३), वर्धा २९.८(१३.४), वाशीम ३१.५ (१९.०), यवतमाळ - (१२.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com