Agriculture news in Marathi Chance of rain with lightning in Konkan, Central Maharashtra | Page 4 ||| Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021

किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे आज (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे.

पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे आज (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्याही खाली आले आहे. सोमवारी (ता. २९) पुणे येथे नीचांकी १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राचे संकेत
अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीलगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उद्यापर्यंत (ता. १) महाराष्ट्राचा किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तसेच दक्षिण अंदमान समुद्रात आज (ता. ३०) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्चिम आणि वायव्य दिशेकडे येताना या प्रणालीची अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :  
कोकण : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.५ (१२.४), नगर - (१४.८), जळगाव ३०.८ (१३.७), कोल्हापूर २९.७ (१९.९), महाबळेश्वर २२.६(१४.६), मालेगाव - (१४.३), नाशिक २८.७ (१२.९), निफाड २८.३ (१७.२), सांगली ३०.८(२०.६), सातारा २९.३(१७.९), सोलापूर ३१.९ (१७.२), सांताक्रूझ ३३.६(२०.०), डहाणू ३३.९ (१९.५), रत्नागिरी ३४.२ (२२.४), औरंगाबाद २९.२ (१३.२), नांदेड ३३.२ (१७.६), परभणी २९.० (१५.०), अकोला ३१.६ (१६.१), अमरावती ३०.४ (१४.५), ब्रह्मपुरी ३२.९ (१४.२), बुलडाणा ३०.२ (१५.२), चंद्रपूर ३१.६ (१४.४), गडचिरोली २९.०(१५.०), गोंदिया ३०.५ (१२.५), नागपूर ३०.२ (१३.३), वर्धा २९.८(१३.४), वाशीम ३१.५ (१९.०), यवतमाळ - (१२.५).


इतर अॅग्रो विशेष
जमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...
‘मध क्लस्टर’ निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत...नाशिक : मधमाशीपालन हे अतिरिक्त रोजगाराचे साधन...
विलंब ‘एफआरपी’चे व्याज  कारखान्यांना...नांदेड : शेतकऱ्यांसोबत बेकायदा करार करून एफआरपीचे...
सोयाबीनसाठी चीनची अमेरिकेवर मदार? पुणे ः ब्राझील आणि अर्जेंटिनात यंदा सोयाबीन...
राज्यात गारठा पुन्हा वाढणार पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
महावितरण विरोधात कऱ्हाडमध्ये शुक्रवारी...कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांना बोगस, चुकीची...
द्राक्ष दराच्या निर्णयाची अंमलबजावणी...नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष मालाच्या उत्पादन...
यंदा डाळिंब निर्यातदार  शेतकरी...सांगली ः राज्यातून डाळिंबाची निर्यात वाढण्यासाठी...
फळबाग लागवडीसाठी  आता सुधारित योजना पुणे ः फलोत्पादन वाटचालीत रोहयो फळबाग लागवडीनंतर...
कोविडमुक्त गाव अभियान पुणे विभागातही...पुणे : जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने...
ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामांबाबत...अकोला ः राज्यातील ग्रामसेवकांकडे असलेली अतिरिक्त...
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
तेलकट डागविरहित डाळिंब अन् बारमाही...तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे...
भात उत्पादक शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल...गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ...
उसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलनसांगली ः तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत...
चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणीचिखलदरा, जि. अमरावती : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात...
बुलडाण्यातील शेतकरी पिकवतोय...बुलडाणा ः स्ट्रॉबेरी म्हटली की थंड वातावरणात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने अनेक...