विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता.१४) महाराष्ट्रातून निरोप घेतला आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आज (ता. १६) विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
Chance of rain with lightning in Vidarbha, Marathwada, North Maharashtra

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत आहे. ही प्रणाली उद्या (ता. १७) निवळणार असून, त्याच्या प्रभावामुळे वाहणारे चक्राकार वारे उत्तर भारतातील राज्यांकडे सरकणार आहे. या प्रणालीमुळे पूर्व भारत, विदर्भासह मध्य भारत आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि केरळच्या किनाऱ्यालगत हवेचे आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याच्या प्रभावामुळे कर्नाटक, केरळ दक्षिण भारतातील राज्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक. मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com