Agriculture news in marathi Chance of rain with lightning in Vidarbha, Marathwada, North Maharashtra | Agrowon

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 ऑक्टोबर 2021

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता.१४) महाराष्ट्रातून निरोप घेतला आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आज (ता. १६) विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता.१४) महाराष्ट्रातून निरोप घेतला आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आज (ता. १६) विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत आहे. ही प्रणाली उद्या (ता. १७) निवळणार असून, त्याच्या प्रभावामुळे वाहणारे चक्राकार वारे उत्तर भारतातील राज्यांकडे सरकणार आहे. या प्रणालीमुळे पूर्व भारत, विदर्भासह मध्य भारत आणि उत्तर भारतातील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि केरळच्या किनाऱ्यालगत हवेचे आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याच्या प्रभावामुळे कर्नाटक, केरळ दक्षिण भारतातील राज्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक.
मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.


इतर बातम्या
सोयापेंड आयातीचा प्रस्ताव नाहीपुणे ः पोल्ट्री उद्योगाने सोयापेंड आयातीसाठी...
सरसेनाध्यक्ष हेलिकॉप्टर अपघातामध्ये...नवी दिल्ली ः तमिळनाडूमध्ये लष्करी हेलिकाॅप्टरला...
सोयाबीन हेक्टरी पिकले बारा क्विंटल ३५...लातूर : पीक कापणी प्रयोगाअंती लातूर जिल्ह्यात...
‘पशुसंवर्धन’च्या लाभासाठी मराठवाड्यातून...औरंगाबाद : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध लाभाच्या...
मंजूर रस्त्यांच्या कामांना ...अकोला ः जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २५...
बंधारे ढीगभर, तरीही पाणीटंचाई शिगेला नागपूर : नरखेड तालुक्यात अनेक ठिकाणी छोटी-मोठी...
पीकविमा जाहीर झाला, पैसै कधी मिळणार? नगर ः नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भरलेला गत वर्षीचा...
‘नाफेड’साठी खरेदी केलेला कांदा चाळीतच...नाशिक : केंद्राच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत ‘...
सातारा जिल्ह्यात पावसाचा १५ हजार...सातारा : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या...
शेतकरी संघटनेचा ठिय्या;  ३५...अकोला ः पातूर तालुक्यातील सस्ती परिसरातील...
पीक आमचं, भावही आम्हीच निश्‍चित करू : ...कोंढाळी, जि. नागपूर : आता पीक आमचे आणि त्याचा...
पुणे जिल्हा बँकेसाठी १५९ अर्ज पात्रपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच,...
देशात नवा खत कायदा आणण्याच्या हालचालीपुणे ः देशासाठी स्वतंत्र खत कायदा तयार करण्याच्या...
शेवग्याला दराची झळाळीकोल्हापूर : राज्यात नुकत्याच झालेल्या...
पीक कापणी प्रयोग  ‘महाडीबीटी’वर कृषी...नागपूर : पीक कापणी प्रयोगाच्या तक्त्यांची संख्या...
बायो-सीएनजी गॅसवर ट्रॅक्टर चालविण्याचा...माळेगाव, जि. पुणे ः शेती आणि शेतीपूरक व्यवसाय...
बायोसिरप तंत्रामुळे इथेनॉल उद्योगाचे...पुणे ः उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करता येते;...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या...
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...नांदेड : जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना...