मेघगर्जनांसह पावसाची शक्यता

राज्याच्या अनेक भागांत दिवसभर उन्हाच्या चटक्यासह, दुपारनंतर वळीव स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ४) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा मेघगर्जनांसह पावसाची शक्यता आहे.
Chance of Rain with Thunderstorms
Chance of Rain with Thunderstorms

पुणे : राज्याच्या अनेक भागांत दिवसभर उन्हाच्या चटक्यासह, दुपारनंतर वळीव स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ४) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा मेघगर्जनांसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडे सरकत आहे. त्यापासून ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच देशाच्या वायव्य भागात ६ ऑक्टोबरपासून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.रविवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, विदर्भ, आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील अमळनेर, करमाळा, पारोळा येथे प्रत्येकी ५० मिलिमीटर, विदर्भातील मूल येथे ६० मिलिमीटर, सावळी येथे ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कोकण : रायगड, रत्नागिरी

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर. मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद. विदर्भ : यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

अरबी समुद्रात कमी दाबाचे संकेत अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत (ता. ५) पश्‍चिम किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत असून, वरील दोन्ही प्रणालींदरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

‘शाहीन’ तीव्र चक्रीवादळ आज ओमानला धडकणार अरबी समुद्रातील शाहीन तीव्र चक्रीवादळ आज (ता. ४) किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी (ता. ३) दुपारी ही वादळी प्रणाली देवभूमी द्वारिकेच्या पश्‍चिमेकडे १०५० किलोमीटर, इराणच्या चाबहार बंदरापासून नैर्ऋत्येकडे २०० किलोमीटर, तर ओमानच्या मस्कतपासून ९० किलोमीटर ईशान्येकडे अरबी समुद्रात होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com