विदर्भात आज पावसाची शक्यता 

मागील आठ दिवसांपासून वादळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. मात्र आजपासून पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश निरभ्र राहणार आहे. तर विदर्भात काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील.
Chance of rain in Vidarbha today
Chance of rain in Vidarbha today

पुणे : मागील आठ दिवसांपासून वादळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. मात्र आजपासून पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश निरभ्र राहणार आहे. तर विदर्भात काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील. आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवार) विदर्भातील अनेक ठिकाणी वादळ, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

राज्यात होत असलेल्या वादळी पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा वाढला आहे. यामुळे पहाटे बऱ्यापैकी गारठा असल्याने किमान तापमानासह कमाल तापमानातही किंचित घट झाली आहे. मागील सात ते आठ दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. गुरुवारी (ता. १५) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस तापमान, तर महाबळेश्‍वर येथे सर्वांत कमी तापमान १५.६ सेल्सिअस नोंदविले गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मध्य प्रदेश, कोकण, कर्नाटक किनारपट्टी आणि केरळ किनारपट्टीदरम्यान असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. तसेच बंगालच्या उपसागर आणि हिमालय, पश्‍चिम बंगाल आणि सिक्किम ते दक्षिण छत्तीसगड व झारखंड आणि ओडिशाचा परिसर या दरम्यान असलेल्या तीव्र कमी दाबाचा पट्ट्याची तीव्रता कमी होऊ लागली आहे. आठवडाभर असलेले ढगाळ वातावरण दूर होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कमी झालेला पारा उन्हाचा पुन्हा वाढेल. 

येथे पावसाची शक्यता :  शुक्रवार ः अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ  शनिवार ः अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com