Agriculture news in marathi Chance of rain in Vidarbha today | Page 2 ||| Agrowon

विदर्भात आज पावसाची शक्यता 

शुक्रवार, 16 एप्रिल 2021

मागील आठ दिवसांपासून वादळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. मात्र आजपासून पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश निरभ्र राहणार आहे. तर विदर्भात काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील.

पुणे : मागील आठ दिवसांपासून वादळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. मात्र आजपासून पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश निरभ्र राहणार आहे. तर विदर्भात काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील. आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवार) विदर्भातील अनेक ठिकाणी वादळ, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

राज्यात होत असलेल्या वादळी पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा वाढला आहे. यामुळे पहाटे बऱ्यापैकी गारठा असल्याने किमान तापमानासह कमाल तापमानातही किंचित घट झाली आहे. मागील सात ते आठ दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. गुरुवारी (ता. १५) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस तापमान, तर महाबळेश्‍वर येथे सर्वांत कमी तापमान १५.६ सेल्सिअस नोंदविले गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मध्य प्रदेश, कोकण, कर्नाटक किनारपट्टी आणि केरळ किनारपट्टीदरम्यान असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. तसेच बंगालच्या उपसागर आणि हिमालय, पश्‍चिम बंगाल आणि सिक्किम ते दक्षिण छत्तीसगड व झारखंड आणि ओडिशाचा परिसर या दरम्यान असलेल्या तीव्र कमी दाबाचा पट्ट्याची तीव्रता कमी होऊ लागली आहे. आठवडाभर असलेले ढगाळ वातावरण दूर होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कमी झालेला पारा उन्हाचा पुन्हा वाढेल. 

येथे पावसाची शक्यता : 
शुक्रवार ः अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ 
शनिवार ः अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी...पुणे ः राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर...
साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...