विदर्भात आजपासून पावसाची शक्यता

आजपासून (बुधवार) संपूर्ण विदर्भात तर शनिवारपासून (ता. २४) मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.
विदर्भात आजपासून पावसाची शक्यता
विदर्भात आजपासून पावसाची शक्यता

पुणे : विदर्भाच्या अनेक भागांत अंशतः ढगाळ वातारणाची स्थिती तयार झाली आहे. यामुळे सकाळपासून उकाड्यात वाढ होत आहे. कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. आजपासून (बुधवार) संपूर्ण विदर्भात तर शनिवारपासून (ता. २४) मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला. 

राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. त्यातच एक मार्चपासून पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला आहे. ३१ मेपर्यत हा हंगाम समजला जात असल्याने राज्यात आठ ते दहा दिवसांच्या फरकाने पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे उन्हाचा चटका, वाढलेला उकाडा यामुळे कमाल तापमानात बऱ्यापैकी वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात चढउतार होत आहे. दोन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. मंगळवारी (ता. २०) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर महाबळेश्‍वर येथे सर्वांत कमी १७.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. 

विदर्भ व परिसरात आणि मराठवाड्यात चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि २.१ किलोमीटरच्या दरम्यान आहे. तसेच मध्य प्रदेशाचा आग्नेय भाग, दक्षिण - उत्तर भाग ते दक्षिण तमिळनाडू, विदर्भ, तेलंगानाणा, रायलसीमापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर ते १.५ किलोमीटरच्या दरम्यान आहे. तर मध्य प्रदेशाच्या आग्नेय भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. या बंगालच्या उपसागरावरील बाष्प खेचले जात असल्याने पुढील काही दिवस विदर्भ व मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com