Agriculture news in Marathi, chances to Mhaisal water off | Agrowon

म्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद होण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जुलै 2019

सांगली ः तब्बल आठ महिने सुरू असलेले म्हैसाळ योजनेचे आवर्तन पाऊस सुरू झाल्याने पुढील आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे. गतवर्षी ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या म्हैसाळ योजनेतून तब्बल १३ टीएमसी पाणी उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यांत पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात आला. म्हैसाळच्या पाण्याचे ४० कोटी रुपये वीजबिल झाले आहे.

सांगली ः तब्बल आठ महिने सुरू असलेले म्हैसाळ योजनेचे आवर्तन पाऊस सुरू झाल्याने पुढील आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे. गतवर्षी ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या म्हैसाळ योजनेतून तब्बल १३ टीएमसी पाणी उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यांत पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात आला. म्हैसाळच्या पाण्याचे ४० कोटी रुपये वीजबिल झाले आहे.

मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यांत पाणीटंचाईमुळे गतवर्षी ऑक्टोबरमध्ये म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात आले. म्हैसाळचे आवर्तन सुरू झाल्यानंतर पाच टप्प्यात सुमारे ७५ पंपांद्वारे उपसा करून जतपर्यंत पाणी पोचविण्यात आले. मार्च महिन्यात मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामासाठी आवर्तन बंद ठेवण्यात आले.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा आवर्तन सुरू केले. आवर्तन सुरू असताना जत तालुक्यात पाणी द्या, अशी मागणी  केली. त्यामुळे मुख्य कालव्यातून जतला विसर्ग सुरू आहे. आजही योजनेतून जत तालुक्यात पाणी दिले जाते आहे. पोटकालव्यासह डोंगरवाडी, गव्हाण यासह सिंचन योजना सुरू आहेत.

ऐन उन्हाळ्यात तीन तालुक्यांतील १६४ गावांतील तलाव म्हैसाळच्या पाण्याने भरण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली. परंतु या १६४ गावांतील तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भासणार आहे. जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला आहे. गेल्या चार दिवसांत जत, तासगाव, कवठेमहांकाळ तालुका वगळता चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पाटंबधारे विभागाने या योजनेचे आवर्तन बंद करण्याचा निर्यण घेतला आहे. 

वास्तविक पाहता जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस नाही. मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. परंतु दुष्काळी पट्ट्यात अद्यापही अपेक्षित पाऊस झाला नाही. या गावात आजही पाणीटंचाई आहे. पाटंबधारे विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार योजना बंद केली तर दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही. त्यामुळे ही योजना अजून सुरू ठेवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आठ कोटी भरावे लागणार
आठ महिन्यांचे सुमारे ४० कोटी रुपये वीजबिल असून, यापैकी १९ टक्के म्हणजे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांकडून सुमारे अडीच कोटी रुपये जमा झाले आहेत. दोन टप्प्यांत आठ महिने आवर्तन सुरू ठेवण्याची ही पहिलीच वेळ असून, जूनच्या अखेरीस पाऊस सुरू झाला आहे. पाऊस सुरू राहिल्यास पुढील आठवड्यात आवर्तन बंद होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


इतर बातम्या
शेवतींच्या फुलांनी जिंकले मन !...मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी...
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...
नांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या...नांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
नगरमध्ये ज्वारीवरील लष्करी अळीबाबत...नगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला...
नमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय...अकोला  ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या...
आघाडी सरकारचे खातेवाटप दोन दिवसांत ः...मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
नांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणीच्या...नांदेड : जिल्ह्यात बुधवार (ता. ४) पर्यंत एकूण १...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
सिंचन घोटाळ्यात अजित पवार निर्दोष;...मुंबई ः राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात...
साखर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष...पुणे ः साखर कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे....