Agriculture news in Marathi, chances to Mhaisal water off | Page 2 ||| Agrowon

म्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद होण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जुलै 2019

सांगली ः तब्बल आठ महिने सुरू असलेले म्हैसाळ योजनेचे आवर्तन पाऊस सुरू झाल्याने पुढील आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे. गतवर्षी ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या म्हैसाळ योजनेतून तब्बल १३ टीएमसी पाणी उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यांत पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात आला. म्हैसाळच्या पाण्याचे ४० कोटी रुपये वीजबिल झाले आहे.

सांगली ः तब्बल आठ महिने सुरू असलेले म्हैसाळ योजनेचे आवर्तन पाऊस सुरू झाल्याने पुढील आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे. गतवर्षी ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या म्हैसाळ योजनेतून तब्बल १३ टीएमसी पाणी उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यांत पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात आला. म्हैसाळच्या पाण्याचे ४० कोटी रुपये वीजबिल झाले आहे.

मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यांत पाणीटंचाईमुळे गतवर्षी ऑक्टोबरमध्ये म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात आले. म्हैसाळचे आवर्तन सुरू झाल्यानंतर पाच टप्प्यात सुमारे ७५ पंपांद्वारे उपसा करून जतपर्यंत पाणी पोचविण्यात आले. मार्च महिन्यात मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामासाठी आवर्तन बंद ठेवण्यात आले.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा आवर्तन सुरू केले. आवर्तन सुरू असताना जत तालुक्यात पाणी द्या, अशी मागणी  केली. त्यामुळे मुख्य कालव्यातून जतला विसर्ग सुरू आहे. आजही योजनेतून जत तालुक्यात पाणी दिले जाते आहे. पोटकालव्यासह डोंगरवाडी, गव्हाण यासह सिंचन योजना सुरू आहेत.

ऐन उन्हाळ्यात तीन तालुक्यांतील १६४ गावांतील तलाव म्हैसाळच्या पाण्याने भरण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली. परंतु या १६४ गावांतील तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भासणार आहे. जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला आहे. गेल्या चार दिवसांत जत, तासगाव, कवठेमहांकाळ तालुका वगळता चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पाटंबधारे विभागाने या योजनेचे आवर्तन बंद करण्याचा निर्यण घेतला आहे. 

वास्तविक पाहता जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस नाही. मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. परंतु दुष्काळी पट्ट्यात अद्यापही अपेक्षित पाऊस झाला नाही. या गावात आजही पाणीटंचाई आहे. पाटंबधारे विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार योजना बंद केली तर दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही. त्यामुळे ही योजना अजून सुरू ठेवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आठ कोटी भरावे लागणार
आठ महिन्यांचे सुमारे ४० कोटी रुपये वीजबिल असून, यापैकी १९ टक्के म्हणजे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांकडून सुमारे अडीच कोटी रुपये जमा झाले आहेत. दोन टप्प्यांत आठ महिने आवर्तन सुरू ठेवण्याची ही पहिलीच वेळ असून, जूनच्या अखेरीस पाऊस सुरू झाला आहे. पाऊस सुरू राहिल्यास पुढील आठवड्यात आवर्तन बंद होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


इतर बातम्या
शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यास प्राधान्य...मुंबई : महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम घडवायचा आहे....
पटवर्धन कुरोलीत वीज उपकेंद्राच्या...पटवर्धन कुरोली, जि. सोलापूर  ः पटवर्धन...
नगर जिल्हा बॅंकेतर्फे वैयक्तिक हमीवर...नगर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विचार...
मर्जीतील लोकांना हळद रोपांचे वाटप,...सिंधुदुर्ग : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मर्जीतील...
सदोष बियाण्यांची भरपाई द्या, अन्यथा...परभणी  ः ‘‘सोयाबीनच्या सदोष बियाण्यांमुळे...
कोरिवडेतील पूरबाधित क्षेत्राचे चुकीचे...आजरा, जि. कोल्हापूर  ः कोरिवडे (ता. आजरा)...
शेतीचा शाश्वत विकास करा : डॉ. डी. एल...औरंगाबाद : ‘‘शेतीतील उत्पन्न वाढवण्याची गरज आहे....
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना...जालना : जिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रांवरून ९३...
खानदेशात अभूतपूर्व खतटंचाईजळगाव ः खानदेशात युरिया, १०.२६.२६, दाणेदार सुपर...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पाच...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १२६...
पालखी मार्गावरील शेतकऱ्यांच्या अडचणीवर...अकलूज, जि. सोलापूर : पुणे ते पंढरपूर या पालखी...
मराठवाड्यातील पाणी टंचाईग्रस्त...औरंगाबाद : साधारणपणे आठवडाभरापूर्वी १४२ वर असलेली...
बा, विठ्ठला.. देशाला कोरोनामुक्त आणि...पंढरपूर, जि. सोलापूर : महाराष्ट्रासह अवघ्या...
मराठवाड्यात जोरदार पावसामुळे काही...औरंगाबाद : मराठवाड्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस...
हिंगोली जिल्ह्यातील कर्जवाटपात व्यापारी...हिंगोली : जिल्ह्यातील विविध बॅंकांनी गुरुवार (ता....
जुन्नर तालुका झाला 'टोमॅटो क्लस्टर'सिंचन सुविधा, लागवडीचे नवे तंत्र आणि जुन्नर कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसाची ६०...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६०...
मसाला पिके, भाजीपाला उत्पन्नाचे नवे साधनरत्नागिरी जिल्ह्यात नारळ, सुपारी बागांमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’कडून...सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने...
ग्राहकांच्या वीजबिलाच्या तक्रारी...सोलापूर : वीज ग्राहकांच्या बिलविषयक तक्रारी...