agriculture news in marathi, The chances of miscarriage to stop mhaisal rotation | Agrowon

म्हैसाळचे आवर्तन बंद होण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 जून 2019

सांगली : म्हैसाळ योजनेतून मागील तीन महिन्यांत पावणेपाच टीएमसी पाणी दुष्काळी सहा तालुक्यांत वितरित करण्यात आले. म्हैसाळ योजनेचे उन्हाळी आवर्तन एक एप्रिल ते आजअखेर जवळपास तीन महिने सुरू आहे. पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर आता योजनेचे आवर्तन अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठवड्याच्या शेवटी योजना बंद होण्याची शक्यता आहे. 

सांगली : म्हैसाळ योजनेतून मागील तीन महिन्यांत पावणेपाच टीएमसी पाणी दुष्काळी सहा तालुक्यांत वितरित करण्यात आले. म्हैसाळ योजनेचे उन्हाळी आवर्तन एक एप्रिल ते आजअखेर जवळपास तीन महिने सुरू आहे. पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर आता योजनेचे आवर्तन अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठवड्याच्या शेवटी योजना बंद होण्याची शक्यता आहे. 

म्हैसाळ योजना मागील तीन महिने मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत, तासगाव या चार तालुक्यांत वरदायिनी ठरली आहे. या चार तालुक्यांत सर्वाधिक पाण्याचे वितरण करण्यात आले. मंगळवेढा भागातही काही ठिकाणी पाण्याची चाचणी घेण्यात आली. पावणेपाच टीएमसीपैकी दीड टीएमसी पाणी टंचाईग्रस्त आणि दुष्काळी भाग म्हणून जिल्हाधिकारी आदेशाने सोडण्यात आले. सुमारे साडेतीन टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात आले.

पावणेपाच टीएमसी पाण्याचे सुमारे पंधरा कोटी रुपये वीजबिल होते. यातील ८१-१९ च्या फॉर्म्युला नुसार ३ कोटी रुपये भरावे लागतील. त्यांपैकी जिल्हाधिकारी आदेशाने सोडलेल्या पाण्याचा म्हणून काही वाटा उचलणार आहेत. दुष्काळी भागातील वीजबिल १/३ सवलत म्हणून कमी करण्यात येईल. त्यामुळे पुन्हा हा आकडा कमी होईल. 

म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी गोळा करण्यात आलेली वसुली रक्कम अडीच कोटी रुपये इतकी आहे. सर्व सवलती आणि योजना वजा जाता किमान एक ते दीड कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अडीच कोटी रुपयांपैकी वीजबिलपोटी भरावे लागतील. त्याशिवाय पुढील आवर्तनास वीज मिळू शकणार नाही. वसूल अडीच कोटी रुपयांपैकी वाट्याला येईल ती रक्कम वीजबिल म्हणून आणि उर्वरित रक्कम पाणीपट्टी म्हणून बाजूला ठेवण्यात येईल. पाणीपट्टी सुमारे अडीच कोटी रुपये होते. कारण अलीकडील शासन निर्णयानुसार ८००० रुपये प्रति १ एमसीएफटी दर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बिळूर भागात पाणी
मे महिन्यात जोपर्यंत पाऊस सक्रिय होत नाही. धरणातील पाणीसाठा उपलब्ध आहे, तोपर्यंत योजना सुरू राहील, असे सांगण्यात आले होते. सध्या जत तालुक्यातील बिळूर भागात पाणी वितरित केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...
छावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...
आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...
नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
साताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्‍...
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...