agriculture news in marathi Chances of rain with cloudy weather | Agrowon

आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह पावसाची शक्‍यता

डाॅ. रामचंद्र साबळे
रविवार, 5 एप्रिल 2020

महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. पूर्व किनारपट्टी लगतच्या भागावर १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे वारे मोठ्या प्रमाणावर पूर्व किनारपट्टी भागावर ढग वाहून आणतील. त्यातूनच मराठवाडा, विदर्भ, दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्राचे दक्षिणेकडील व उत्तरेकडील जिल्ह्यात व दक्षिण कोकणातील जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. पाऊस होण्यापूर्वी ढगांचा गडगडाट व विजांचे कडकडानंतर पाऊस सुरु होईल.
 

महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. पूर्व किनारपट्टी लगतच्या भागावर १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे वारे मोठ्या प्रमाणावर पूर्व किनारपट्टी भागावर ढग वाहून आणतील. त्यातूनच मराठवाडा, विदर्भ, दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्राचे दक्षिणेकडील व उत्तरेकडील जिल्ह्यात व दक्षिण कोकणातील जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. पाऊस होण्यापूर्वी ढगांचा गडगडाट व विजांचे कडकडानंतर पाऊस सुरु होईल.

एप्रिल महिन्यातील पाऊस हा थोड्याशा कालावधीत होतो. विदर्भातील अकोला व अमरावती जिल्ह्यात, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व जालना जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात तर पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यासह कोकणात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे.
काही काळ ढगाळ हवामान तसेच सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्केचे जवळपास तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के इतकी कमी म्हणजे कोरडे हवामान राहील. वाऱ्याची दिशा कधी वायव्येकडून, काही भागात ईशान्येकडून प्रामुख्याने राहील. सध्याचे काळात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रावर राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. मात्र याच काळात कमाल तापमानात वाढ होऊन ते ३८ ते ४० अंश सेल्सिअस राहण्यामुळे दुपारी उष्ण हवामान राहील. 

कोकण
सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात ते ४० अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. तर रायगड व ठाणे जिल्ह्यात ते २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६८ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ टक्के व उर्वरित सर्वच जिल्ह्यात ती २२ ते २७ टक्के राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक ५ व ६ एप्रिल रोजी २० ते ३२ मि.मि. व रत्नागिरी जिल्ह्यात ३ ते ६ मि.मी. राहील. 

उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात दिनांक ५ एप्रिल रोजी पावसाचा जोर राहील व ४ ते ११ मि.मी. पावसाची शक्‍यता राहील. जळगाव जिल्ह्यात दिनांक ६ एप्रिल रोजी ४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस व नाशिक जिल्ह्यात ते ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ६१ टक्के तर दुपारची २४ ते ३१ टक्के राहील. 

मराठवाडा 
हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. पावसाची शक्‍यता या जिल्ह्यात कमी राहील. सर्वच जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ६९ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३७ टक्के राहील. 

पश्‍चिम विदर्भ 
बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात पावसाची शक्‍यता कमी आहे. अकोला व अमरावती जिल्ह्यात ३ ते ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. तर वाशिम जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस तर बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६७ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३६ टक्के राहील. 

मध्य विदर्भ 
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात पावसाची शक्‍यता कमी राहील. यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६५ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २९ टक्के राहील. 

पूर्व विदर्भ 
पूर्व विदर्भात या आठवड्यात पावसाची शक्‍यता कमी आहे. पूर्व विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते ३० टक्के राहील. 

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र 
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, नगर या सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक ५ ते ७ एप्रिल या कालावधीत प्रतिदिनी २८ ते ३४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सांगली जिल्ह्यात १६ ते ३४ मि.मी., सातारा जिल्ह्यात १६ ते २२ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात १५ ते २२ मि.मी., पुणे जिल्ह्यात ३ ते १२ मि.मी. व नगर जिल्ह्यात ६ ते १२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस, सांगली व सोलापूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस तर पुणे व नगर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे व नगर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, सांगली व सातारा जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर सोलापूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस व कोल्हापूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ६७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३६ टक्के राहील. 

कृषी सल्ला

  • नवीन लागवड केलेल्या कलमांना काठीचा आधार द्यावा. 
  • नवीन लागवड केलेल्या नारळांच्या रोपांना किलतानाच्या मंडपाची सावली करावी. 
  • सुरु आणि खोडवा उसात खुरपणी करुन तण नियंत्रण करावे. 
  • जनावरांसाठी पुरेसा हिरवा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी मक्याच्या आफ्रिकन टॉल जातीची लागवड करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती)


इतर ताज्या घडामोडी
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी...जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व...
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा...जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा...नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन...नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटनासातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...
जालन्यातील ७६२ तूर उत्पादकांना...जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून...
अमरावतीत २५ जिनींगव्दारे कापूस खरेदीअमरावती ः खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीला...
सोलापुरात खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या...सोलापूर : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना थेट...
पुणे बाजार समिती उद्यापासून सुरू होणारपुणे ः कोरोना टाळेबंदीमुळे गेली सुमारे दीड...
चांदोरीत शॉर्टसर्किटमुळे १० एकर ऊस खाक चांदोरी, जि. नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी...
बाजार समित्यांनी सीसीआयला मनुष्यबळ...वर्धा ः सीसीआयकडे आवश्‍यक ग्रेडर कमी आहेत....
औरंगाबादमध्ये खरिपातील बियाणे विक्री...औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच...पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...
कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करुन द्या...पुणे ः खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते...
माॅन्सूनपूर्वी करा कापसाची खरेदी ः...अमरावती ः वरुड तालुक्‍यात लॉकडाऊनमुळे सीसीआय तसेच...
टोळधाडबाधीत क्षेत्रातील मदतीचे प्रस्ताव...अमरावती ः जिल्ह्यात टोळधाडीच्या झुंडीने केलेल्या...
ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचलेसांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू...