agriculture news in marathi chances of Rainfall in eastern Vidarbha and western Maharashtra | Agrowon

पूर्व विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 22 मार्च 2020

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावरील हवेचा दाब कमी होत असून समान १०१० हेप्टापास्कल इतका राहील. मात्र, काश्मीरवर १०१२ ते १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व पूर्वेकडील सातारा जिल्ह्याच्या भागात पावसाची शक्‍यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची शक्‍यता आहे.
 

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावरील हवेचा दाब कमी होत असून समान १०१० हेप्टापास्कल इतका राहील. मात्र, काश्मीरवर १०१२ ते १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व पूर्वेकडील सातारा जिल्ह्याच्या भागात पावसाची शक्‍यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची शक्‍यता आहे.

पश्‍चिमी चक्रवाताचा प्रभाव, बंगालच्या उपसागरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र या हवामान बदलाच्या प्रभावाने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही काही भागांत ढगाळ हवामान आणि पावसाची शक्‍यता आहे. हवामान बदलाला आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे हिंदी महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे वाढत असलेले तापमान आहे. हे वाढते तापमान बाष्पनिर्मितीस अनुकूल ठरत असून ते सन २००० सालापासून आजपर्यंत काही भागांत ०.५ अंश सेल्सिअसने तर काही भागांत ०.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढत असल्याचे दिसून आले आहे. हवेच्या प्रदूषणाशिवाय हा देखील एक महत्त्वाचा घटक हवामान बदल वेगाने होण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे ऋतूचक्रावरही त्याचा परिणाम झाला आहे. या आठवड्यात कमाल तापमानातही वाढ होईल.

कोकण
रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. ठाणे जिल्ह्यात ३९ अंश, रायगड जिल्ह्यात ३८ अंश तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ७१ टक्के व रायगड जिल्ह्यात ७२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २४ ते २५ टक्के तर ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २६ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर व वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवार (ता. २४) रोजी १३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे.

उत्तर महाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. धुळे जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किलोमीटर राहील. नाशिक जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून तर उर्वरित धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत नैऋत्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

मराठवाडा
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. बीड व जालना जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस तर नांदेड जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ६५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत ईशान्येकडून तर औरंगाबाद जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ
अमरावती जिल्ह्यात ४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ६३ टक्के तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ६४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांत ३३ टक्के तर वाशीम जिल्ह्यात ३४ टक्के व अकोला जिल्ह्यात ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किलोमीटर राहील. अमरावती जिल्ह्यात वाऱ्याची दिशा
ईशान्येकडून तर बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत आग्नेयेकडून, तर अमरावती जिल्ह्यांत ती ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात रविवार (ता. २२) रोजी १४ मि.मी. तर सोमवार (ता. २३) रोजी ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ६८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३६ टक्के राहील.

पूर्व विदर्भ
चंद्रपूर जिल्ह्यात सोमवार व मंगळवार (ता. २२ व २३) रोजी २४ मि.मी. तर गडचिरोली जिल्ह्यात ९ मि.मी. व गोंदिया जिल्ह्यात ८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. मात्र, गोंदिया जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ७५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ४१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर व दिशा ईशान्येकडून राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र 
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत मंगळवार (ता. २४) रोजी १७ मि.मी. तर सातारा जिल्ह्यात ७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किलोमीटर राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस तर सातारा व सांगली जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. तसेच पुणे व नगर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते ३४ टक्के राहील.

कृषी सल्ला

  • महाराष्ट्राच्या मध्य व पूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता आहे. तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता असल्याने मळणी केलेले धान्य उघड्यावर ठेवू नये.
  • हळद उकडून वाळत घातली असल्यास ढीग करून झाकून घ्यावी.
  • उन्हाळी पिकांत तण नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावीत.
  • नवीन लागवड केलेल्या रोपांना आधार द्यावा.

- ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञसदस्य, संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र


इतर कृषी शिक्षण
उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रगत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने...
कोडोली येथे कंपोस्ट खत निर्मिती...कोडोली (जि .सातारा) ः ग्रामीण कृषी कार्यानुभव...
कृषीकन्येने भरविले रानभाज्याचे प्रदर्शनरानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने...
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
परदेशी भाज्यांच्या लागवडीचा प्रयोगबीड येथील सौ.के.एस.के.(काकू) कृषि महाविद्यालयात...
कृषी विद्यार्थी पोहोचविताहेत नवे तंत्रपुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर...
कृषीकन्या सांगताहेत जमीन सुपिकतेचे फायदेमाळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयातील...
मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी गाईतील...दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे...
मध्यपूर्व प्रदेशातील पावसात ४० टक्के घटविविध प्रारूपाद्वारे मध्यपूर्वेतील पावसाच्या...
सूक्ष्म अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया...मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
कृषी पदवीच्या परीक्षांचा कृती आराखडा...अकोला/नाशिक ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पीक कर्जावरील व्याज आकारणीवेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...