agriculture news in marathi `Chandanpuri Khanderao Maharaj Yatra festival is not allowed` | Agrowon

`चंदनपुरी खंडेराव महाराज यात्रोत्सवास परवानगी नाही`

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जानेवारी 2021

नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील  यात्रोत्सवास परवानगी नाकारली’’, अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली.

नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील श्री क्षेत्र खंडेराव महाराज यात्रोत्सव दरवर्षी पौष पौर्णिमेला जानेवारी महिन्यात होत असतो. हा यात्रोत्सव १५ ते २० दिवस चालत आहे. या ठिकाणी जवळपास दीड ते दोन लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनच्या विषाणूचे संकट उभे ठाकले. त्यामुळे याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी चंदनपुरी यात्रोत्सवास परवानगी नाकारली’’, अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली. 

श्रीक्षेत्र खंडेराव महाराज यात्रा यावर्षी २८ जानेवारीपासून सुरु होणार होती. परंतु संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नव्या रूपाने वेगात पसरत आहे. राज्यात शासनाने लॉकडाऊनचा कालावधी हा ३१ जानेवारीपर्यंत वाढविला आहे. अशा संकटाच्या काळात यात्रा, उरुस व इतर धार्मिक उत्सवांमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र होऊ शकतो. अशा कार्यक्रमांना शासनाने परवानगी दिलेली नाही. त्याच अनुषंगाने चंदनपुरी येथील श्री क्षेत्र खंडेराव महाराज यात्रेस परवानगी नाकारण्यात आल्याचे शर्मा यांनी कळविले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन यात्रोत्सवाची परवानगी नाकारण्यात आली. तसे चंदनपुरी ग्रामपालिकेच्या प्रशासकांना लिखित स्वरूपात कळविण्यात आले आहे. या यात्रोत्सवाची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिस प्रशासनास कळविण्यात आली आहे. तरी या यात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
नव्या कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना...नाशिक : श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू...
येवल्यात ४६ हजार ग्राहकांकडे २६६ कोटी...येवला, जि. नाशिक : तालुक्यातील कृषिपंप धारकांची...
हवामान बदलाचा आंब्यावरील परिणाम...रत्नागिरी ः वातावरणातील चढ-उताराचे आंबा पिकावर...
परभणीत तूर विक्रीसाठी ६ हजार...परभणी ः आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी...
आम्हाला सोडून गेले, ते पराभूत झाले :...नगर : राज्य विधानसभेत मी १९८० साली ५६ आमदारांचा...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या...नागपूर ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून...
पी. आर. पाटील साखर संघाचे पुढील अध्यक्ष... कुरळप, जि. सांगली :  सहकार क्षेत्रातील...
निळेली पशुधन संशोधन केंद्रास वंश...सिंधुदुर्गनगरी ः कोकण कन्याळ या शेळी जातीच्या...
सिंधुदुर्गमध्ये बांधले साडेपाच हजार...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात भासणाऱ्या संभाव्य...
अमरावतीत शेतकऱ्यांवर ४३ कोटींच्या...अमरावती : हंगामात बॅंकांकडून पीककर्जाच्या बाबतीत...
भंडाऱ्यात ८९५ शेतकऱ्यांचे सूक्ष्म...भंडारा : सूक्ष्म सिंचनाला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा...
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदीरायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान...
‘किसान गणतंत्र परेड’ शांततेतच होणार नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा एक...
नक्षत्रांचे गणित चुकू लागलेगावातील वयोवृद्ध माणसे हाताच्या बोटांवर गणिते करत...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
हवामान बदलाला अनुरूप पीक पद्धतीची गरजजागतिक पातळीवर विविध मार्गांनी हवेमधील कार्बन...
कृषी कायद्यांविरोधात शेतकरी विधवांचा...यवतमाळ : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख ७० हजार...नांदेड : जिल्ह्यात रब्बीमध्ये दोन लाख सत्तर हजार...
पावणेतीन हजार कोटींची कामे मंजूर ः...नांदेड : ‘‘कारोना संसर्गाच्या काळात विकास...
खानदेशातील प्रकल्पांत ५८ टक्के पाणीजळगाव ः खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये...