agriculture news in marathi, chandarpur again above 46 degree Celsius | Agrowon

'चंद्र'पूर पुन्हा ४६ अंशांवर !
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 मे 2018

पुणे : पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात ढग गोळा होऊ लागेल आहेत. वाढलेली उष्णता आणि अंशत: ढगाळ हवामान यामुळे उकाड्यातही वाढ झाली अाहे. उद्यापासून (ता. ११) राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली अाहे. दोन दिवसांपासून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे घटलेले तापमान पुन्हा वाढणार आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्षप्ट केले आहे.

पुणे : पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात ढग गोळा होऊ लागेल आहेत. वाढलेली उष्णता आणि अंशत: ढगाळ हवामान यामुळे उकाड्यातही वाढ झाली अाहे. उद्यापासून (ता. ११) राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली अाहे. दोन दिवसांपासून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे घटलेले तापमान पुन्हा वाढणार आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्षप्ट केले आहे.

उत्तर भारतात असलेल्या धुळीच्या वादळाची स्थिती निवळून गेल्यानंतर उत्तर प्रदेश ते विदर्भापर्यंत असलेला कमी दाबाच पट्टा विरून गेला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वाऱ्यांचा वेग वाढून तापमानात १ ते २ अंशांची घट झाली होती. विदर्भात मात्र तापमानाचा पारा वाढला होता. बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उचांकी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा ३२ ते ४२ अंश सेल्सिअस, कोकणात ३३ ते ३४ अंशाच्या आसपास आहे. तर विदर्भात कमी झालेले तापमान पुन्हा वाढू लागले आहे. विदर्भात बहुतांशी ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहेत. तर मराठवाड्यात तापमान ३९ ते ४३ अंशांच्या जवळपास आहे.

बुधवारी (ता. ९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.६, नगर ४३.०, जळगाव ४२.८, कोल्हापूर ३७.५, महाबळेश्वर ३२.२, मालेगाव ४२.२, नाशिक ३८.१, सांगली ३९.०, सातारा ३९.७, सोलापूर ४२.१, मुंबई ३३.५, रत्नागिरी ३४.२, डहाणू ३४.७, आैरंगाबाद ३९.५, परभणी ४३.६, अकोला ४३.०, अमरावती ४२.८, बुलडाणा ३९.८, चंद्रपूर ४६.०, गोंदिया ४२.८, नागपूर ४४.४, वर्धा ४४.०, यवतमाळ ४३.०. 

इतर अॅग्रो विशेष
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
जमीन सुपीकता जपत दर्जेदार संत्रा...दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत...
केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोगजळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
लावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...
खजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...