चंद्रभागेत मिसळतेय मैलामिश्रित सांडपाणी

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातून येणारे गटारीचे पाणी थेट चंद्रभागेत येते. याबाबत संबंधितांना वेळोवेळी सूचना केल्या आहेत. घाण पाणी त्वरित थांबवावे; अन्यथा वारकरी सेवा महासंघाच्या वतीने आंदोलन केले जाईल. - ज्ञानेश्‍वर महाराज जोगदंड, प्रदेश सचिव, वारकरी सेवा महासंघ चंद्रभागा आणि पंढरपूरच्या विकासासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. तरीही घाण पाण्यात भाविकांना स्नान करावे लागते. हे विठ्ठल भक्तांचे दुर्दैव म्हणावे लागेल. - बळिराम तांबेकर, भाविक, कागल, जि. कोल्हापूर शहरातील घाण पाणी वाहून जाण्यासाठी नदीकाठच्या भागात ड्रेनेज करण्यात आले आहे. कुंभार घाटाजवळ गटारीचे पाणी साठवण्यासाठी मोठा खड्डा आहे. त्यातील पाणी पंपाद्वारे उपसा करून अन्य ठिकाणी सोडले जाते. पावसाचे पाणी नदीपात्रात गेले होते. तेही तत्काळ बंद केले. - अभिजित बापट, मुख्याधिकारी, नगरपालिका, पंढरपूर
चंद्रभागेत मिसळतेय मैलामिश्रित सांडपाणी
चंद्रभागेत मिसळतेय मैलामिश्रित सांडपाणी

पंढरपूर : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीच्या प्रदूषण आणि स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना शहरातील मैलामिश्रित पाणी आजही चंद्रभागेत मिसळत असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.

चंद्रभागा नदीतील जलशुद्धीकरणासाठी राज्य सरकारने गंगा नदीच्या धर्तीवर नमामि चंद्रभागा ही योजना जाहीर केली आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा केली आहे. मात्र, शुद्धीकरणासाठी दोन वर्षांमध्ये एक रुपयादेखील खर्च केला नाही. ही योजना आजही कागदावरच आहे. यात्रा आली, की योजनेची चर्चा सुरू होते. आजही शहरातील गटारातून वाहून जाणारे मैलामिश्रित पाणी चंद्रभागा नदीपात्रात मिसळले जाते.

प्रदूषित नदीपात्र चंद्रभागा नदीपात्राच्या प्रदूषण आणि स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे, असे न्यायालयाचे निर्देश असतानादेखील स्थानिक प्रशासनाकडून मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे या प्रकारानंतर समोर आले आहे. घाण पाण्यामुळे नदीला गटारगंगेचे स्वरूप आल्याने तिचे पावित्र्य धोक्‍यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com