भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी श्री. पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा केली. पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे राज्यात आगामी विधानसभा निवडणूक भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात लढवणार हे निश्चित झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्यावर सोपवली आहे. 

रावसाहेब दानवे यांच्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर होते. नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला यश मिळवून देण्यासाठी कंबर कसली होती. तसेच बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तगडा उमेदवार उभा करून राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांच्याच बालेकिल्ल्यात कोंडी केली होती. पाटील यांच्या रणनीतीमुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात लक्षणीय यश मिळाले होते.

चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करतानाच भाजपने स्वतंत्र देव सिंह यांची पक्षाच्या उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. चंद्रकांत पाटील हे फडणवीस सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जातात. त्यांच्याकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचा कार्यभार आहे.

मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला होता. तेव्हापासूनच ते प्रदेशाध्यक्षपद सोडतील, अशी चर्चा होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आशिष शेलार यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या जागी मंगलप्रभात लोढा यांची निवड करण्यात आली. या पदासाठी खासदार मनोज कोटक आणि आमदार योगेश सागर यांची नावे चर्चेत होती. राज्यात मराठा कार्ड खेळणाऱ्या भाजपने मुंबईत गुजराती, मारवाडी कार्ड वापरले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ही खेळी केल्याचे बोलले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com