भाजपमध्ये प्रवेश केला, तरी दोषींवर कारवाई होणारच : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

सोलापूर  ः निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढते आहे, हे खरे आहे. त्यात काही नेत्यांनी बेकायदेशीर कामे केली आहेत. त्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. पण त्यांना भाजपात प्रवेश मिळाला म्हणजे सर्व आरोपातून वा चौकशीतून सूट मिळाली, असे नाही. कायद्यानं जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होणारच, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये वाढलेल्या ‘इनकमिंग’वर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर सोमवारी सोलापुरात उत्तर दिले. 

भाजपचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी श्री. पाटील यांनी पत्रकारांशी बोलत होते. काॅँग्रेस-राष्ट्रवादी काॅँग्रेसमधील निम्मे  लोक आमची सत्ता आल्यानंतर जेलमध्ये जातील, इतके त्यांचे गुन्हे आहेत, असे सांगणारे भाजपचे नेतेच, आता या सर्व लोकांना भाजपमध्ये घेत आहे. भाजप अशा लोकांचं जेल आहे का? या प्रश्‍नावर पाटील म्हणाले, की आम्ही कोणालाही सोडणार नाही, भाजपने जरी अनेकांना पक्षात प्रवेश दिला असला तरी त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्यातून त्यांना अभय मिळणार नाही. जिल्हा बॅंकेवरील कारवाई टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे का? यावरही चौकशी सुरू आहे, दोषींवर कारवाई होणार आहे, असे ते म्हणाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी कायद्याच्या पुढे सर्व समान आहेत. सिंचन प्रकरणात सगळी कागदपत्रे आम्ही न्यायालयात सादर केली आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय कधीही लागू शकतो, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com