चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड

Chandrakant Patil re-elected as BJP state president
Chandrakant Patil re-elected as BJP state president

मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची गुरुवारी फेरनिवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही घोषणा केली. पाटील यांना महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदी, तर आमदार मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. 

भाजपच्या प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे होती. राज्यातील फडणवीस सरकार सत्तेतून गेल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची चर्चा होती. विशेष म्हणजे याआधी त्यासाठी सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रेशखर बानवकुळे ही नावे चर्चेत होती. संघाच्या जवळच्या नेत्यांकडेच प्रदेशाध्यपद द्यावे, असा संघ नेत्यांचा सूर होता. मात्र पाटील अमित शाहा यांच्या जवळचे असल्याने पाटलांचीच वर्णी लागणार, अशी चर्चा होती. त्यावर शिक्कामोर्तब झाले. 

२०१३ मध्ये पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. २०१४ मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवत विधानपरिषदेत त्यांनी पुन्हा प्रवेश केला. २०१४ मध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारमध्ये पहिल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सहकार, पणन, सार्वजानिक बांधकाम या विभागांची सूत्रे सोपवण्यात आली. २०१६ पासून पाटील महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री होते. 

दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर फडणवीस यांनी पाटील यांच्याकडे कृषी खात्याचा कार्यभार सोपवला. तत्कालीन भाजपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर जुलै २०१९ मध्ये पाटील यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com