सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज शक्यः चंद्रकांत पाटील

सौर उर्जा प्रकल्पाचे लोकार्पण
सौर उर्जा प्रकल्पाचे लोकार्पण

कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त वीज द्यायची असेल तर सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. शासनातर्फे उभारले जाणारे सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांच्या लाभदायक ठरतील, असा विश्‍वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथे व्यक्त केला.    महावितरणच्या २.४२ मेगावॉट सौर प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी’ योजनेंतर्गत महावितरणच्या मोकळ्या जागेत सौरऊर्जेद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाच्या ईईएसएल कंपनीसोबत २०० मेगावॉट वीज खरेदीचा करार केला आहे. त्यातून गडहिंग्लज तालुक्यात गडहिंग्लज व हलकर्णी, तर चंदगड तालुक्यातील शिनोली येथे अनुक्रमे १ मेगावॉट, ०.७ व ०.५ मेगावॉट क्षमतेचे लघु सौरऊर्जा प्रकल्प साकारले आहेत. याचा लाभ सुमारे ५०० कृषी पंपधारक शेतकऱ्यांना होणार आहे. म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंहराजे घाटगे, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार हसन मुश्रीफ, श्रीपतराव शिंदे, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, हलकर्णीच्या सरपंच विलासमती शेरवी, शिनोळीच्या सरपंच नम्रता पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले, प्रभारी अधीक्षक अभियंता सागर मारुलकर, कार्यकारी अभियंता सुरेंद्रनाथ भोये, ईईएसएल कंपनीचे संचालक व्यंकटेश द्विवेदी, प्रादेशिक व्यवस्थापक दीपक कोकाटे आदींची उपस्थिती होती. मंत्री पाटील म्हणाले, कोळशाची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे पारंपरिक विजेवरचे अवलं‍बित्वही कमी करावे लागणार आहे. जलविद्युत निर्मितीलाही मर्यादा आहेत. त्यात अपारंपरिकमध्ये सौरऊर्जा मुबलक व ३६५ दिवस उपलब्ध आहे. सौरऊर्जेत एकदाच गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक वाढविल्यास राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आगामी दोन वर्षांत सौरऊर्जेवर वळविता येईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com