agriculture news in marathi, chandrakant patil says, more electricity will be available from solar, kolhapur, maharashtra | Agrowon

सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज शक्यः चंद्रकांत पाटील
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त वीज द्यायची असेल तर सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. शासनातर्फे उभारले जाणारे सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांच्या लाभदायक ठरतील, असा विश्‍वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथे व्यक्त केला.   

कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त वीज द्यायची असेल तर सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. शासनातर्फे उभारले जाणारे सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांच्या लाभदायक ठरतील, असा विश्‍वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथे व्यक्त केला.   

महावितरणच्या २.४२ मेगावॉट सौर प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी’ योजनेंतर्गत महावितरणच्या मोकळ्या जागेत सौरऊर्जेद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाच्या ईईएसएल कंपनीसोबत २०० मेगावॉट वीज खरेदीचा करार केला आहे. त्यातून गडहिंग्लज तालुक्यात गडहिंग्लज व हलकर्णी, तर चंदगड तालुक्यातील शिनोली येथे अनुक्रमे १ मेगावॉट, ०.७ व ०.५ मेगावॉट क्षमतेचे लघु सौरऊर्जा प्रकल्प साकारले आहेत. याचा लाभ सुमारे ५०० कृषी पंपधारक शेतकऱ्यांना होणार आहे.

म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंहराजे घाटगे, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार हसन मुश्रीफ, श्रीपतराव शिंदे, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, हलकर्णीच्या सरपंच विलासमती शेरवी, शिनोळीच्या सरपंच नम्रता पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले, प्रभारी अधीक्षक अभियंता सागर मारुलकर, कार्यकारी अभियंता सुरेंद्रनाथ भोये, ईईएसएल कंपनीचे संचालक व्यंकटेश द्विवेदी, प्रादेशिक व्यवस्थापक दीपक कोकाटे आदींची उपस्थिती होती.

मंत्री पाटील म्हणाले, कोळशाची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे पारंपरिक विजेवरचे अवलं‍बित्वही कमी करावे लागणार आहे. जलविद्युत निर्मितीलाही मर्यादा आहेत. त्यात अपारंपरिकमध्ये सौरऊर्जा मुबलक व ३६५ दिवस उपलब्ध आहे. सौरऊर्जेत एकदाच गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक वाढविल्यास राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आगामी दोन वर्षांत सौरऊर्जेवर वळविता येईल. 

इतर बातम्या
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूजजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
...अन् नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले...मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, नारळ, सुपारी... सिंधुदुर्ग  ः कुणी तीन लाख तर कुणी दोन...
राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभववर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
पीएच.डी.साठी गुरुवारी सामाईक प्रवेश...पुणे ः  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-... भंडारा  ः विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्गसातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारकऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात...
बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली १३२५...बुलडाणाः जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना...