...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती : चंद्रकांत पाटील

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर ती बारामतीत करून ती जागादेखील भाजपला सहज मिळविता आली असती. त्यामुळे ‘ईव्हीएम’मधील गडबडीचा मुद्दा विरोधकांनी आपले अपयश झाकण्यासाठी आणि त्या माध्यमातून स्वतःचे समाधान करून घेण्यासाठी निमित्त केला असल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. 

नागपूर दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (ता. २४) उपराजधानीतील पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, की निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या पाच वर्षांत पक्षाने राज्यातील सर्वच निवडणुकांमध्ये यश संपादित केले आहे. तोच आत्मविश्‍वास घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. या दरम्यान विविध विकासांच्या योजनांना गती देण्यात आली. शेतकरीहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला गेला. गाव, शहरांमध्ये प्राथमिक सोयी- सुविधा उभारण्यात आघाडी घेतल्याने जनतेचा कौल यावेळीदेखील आम्हालाच मिळेल, हा आत्मविश्‍वास आहे.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा वैचारिक अजेंडा एकच असल्याने विधानसभेच्या निवडणुकीत युती कायम राहणार आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला तयार व्हायचा असून जागा अदलाबदलाची शक्‍यतादेखील फारच कमी आहे. अपवादात्मक स्थितीत जागा बदलाचा निर्णय होईल. ‘ईव्हीएम’मध्ये गडबडीचा मुद्दा विरोधक उपस्थित करीत आहेत. परंतू बॅलेट पेपरवर निवडणूक झाली तरी आम्हीच जिंकू, असे त्यांनी सांगितले.

‘ईडी’ची कारवाई एका दिवसाची नाही’ ईडी तसेच इतर सर्वच यंत्रणा स्वायत्त असून, त्यांचा तपास सुरूच असतो. त्यांच्याकडून होणारी कारवाईची प्रक्रिया एका दिवसात होणारी नसते. परंतू साधी स्कूटर चालविणारे वीस वर्षांत कोट्यधीश कसे झाले याचादेखील विचार होणे गरजेचे आहे, असे श्री. पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com