चंद्रपूर जिल्ह्यात धानाचे रखडले २८ कोटींचे चुकारे

चंद्रपूर ःसरकारकडून निधी वितरणास दिरंगाई होत आहे. त्यामुळे २८ कोटी ११ लाख ५० हजार रुपयांचे चुकारे रखडले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात धानाचे रखडले २८ कोटींचे चुकारे
चंद्रपूर जिल्ह्यात धानाचे रखडले २८ कोटींचे चुकारे

चंद्रपूर ः धानाला हमीभावासोबतच बोनस दिला जात आहे. त्यामुळे आधारभूत केंद्रावर धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची पसंती आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने २६ केंद्रांवरून २ लाख ८८ हजार १३७ क्‍विंटल धान खरेदी केली. परंतु सरकारकडून निधी वितरणास दिरंगाई होत आहे. त्यामुळे २८ कोटी ११ लाख ५० हजार रुपयांचे चुकारे रखडले आहेत. 

चंद्रपूर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन सोबत काही तालुक्‍यांमध्ये धान लागवड क्षेत्र आहे. नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, चिमूर, ब्रम्हपूरी व गोंडपिपरी तालुके धानाचे कोठार म्हणून ओळखले जातात. केंद्र शासनाने धानाला १८६८ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. त्यासोबतच राज्य सरकारने ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली. त्यामुळे धानाचे दर राज्यात २५०० रुपयांवर पोचले आहेत. कमी दराने व्यापारी धानाची खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हमीभाव केंद्रावर विक्रीकडे आहे. परिणामी, या केंद्रावर धानाची वाढती आवक आहे. 

यंत्रणांकडून शेतकऱ्यांची कोंडी

आदिवासी विकास महामंडळाकडून देखील जिल्ह्यात धान खरेदी सुरू आहे. त्यांचे देखील चुकारे रखडले आहेत. त्याविषयीची माहिती मिळू शकली नाही. दोन्ही यंत्रणांकडून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com