agriculture news in marathi, Chandrapur faces highest temperature in country | Page 2 ||| Agrowon

चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी तापमानाची नोंद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील उकाड्यात सकाळपासून वाढ झाली आहे. कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील चंद्रपूरमध्ये ४५.४ अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे, असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील उकाड्यात सकाळपासून वाढ झाली आहे. कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील चंद्रपूरमध्ये ४५.४ अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे, असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   

मार्च महिन्यात कोकणातील भिरा येथे ४५.६ अंश सेल्सिअसची उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा बुधवारी राज्यात ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा वाढला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून उकाडा जाणवायला सुरवात होत आहे. दुपारी उन्हाच्या कडाक्यामुळे तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे.

विदर्भात सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. चंद्रपूरपाठोपाठ नागपुरातही कमाल तापमान ४३.२ अंशांवर होते. सकाळपासून तयार जाणवणाऱ्या उकाड्यामुळे कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. परिणामी नागरिकांना सर्दीसारखे आजार उद्भवू लागले आहेत. विदर्भानंतर कोकणातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे सर्वाधिक ४३.० अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. मराठवाड्यातील परभणी येथे ४३.६ अंश सेल्सिअसची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.   

कोकणचा दक्षिण भाग आणि गोव्याच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच हिंदी महासागर आणि मालदीवचा परिसर या भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.  कर्नाटक, रायलसीमा ते तमिळनाडूचा दक्षिण भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी (ता. २२) विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. २३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. आज आणि उद्या गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार असले, तरी वातावरणात काही ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहणार असून, उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) ३५.६, अलिबाग ३४.२, रत्नागिरी ३५.०, डहाणू ३५.०, पुणे ३८.६, जळगाव ४३.०, कोल्हापूर ३६.३, महाबळेश्वर ३३.५, मालेगाव ४२.२, नाशिक ३८.८, सांगली ३७.३, सातारा ३८.६, सोलापूर ४१.१, औरंगाबाद ३९.४, परभणी शहर ४३.६, अकोला ४४.०, अमरावती ४१.८, बुलडाणा ४०.२, ब्रह्मपुरी ४३.१, चंद्रपूर ४५.४, गोंदिया ४१.०, नागपूर ४३.२, वर्धा ४३.६, यवतमाळ ४२.५.

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...