चंद्रपूरला मळणी यंत्राला मिळणार २५ लिटर डिझेल

चंद्रपूरः ‘कोरोना’मुळे सर्वदूर निर्बंध लावण्यात आले आहेत. शेतीकामांवर ही याचा परिणाम झाला असून मळणी यंत्राकरीता डिझेल उपलब्धतेची अडचण निर्माण झाली आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर हा प्रश्‍न गेल्यानंतर त्यांनी तत्काळ यांची दखल घेत २५ लिटर डिझेल उपलब्धतेची सूचना केली.
Chandrapur will get 6 liters of diesel from the sowing machine
Chandrapur will get 6 liters of diesel from the sowing machine

चंद्रपूर ः ‘कोरोना’मुळे सर्वदूर निर्बंध लावण्यात आले आहेत. शेतीकामांवर ही याचा परिणाम झाला असून मळणी यंत्राकरीता डिझेल उपलब्धतेची अडचण निर्माण झाली आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर हा प्रश्‍न गेल्यानंतर त्यांनी तत्काळ यांची दखल घेत २५ लिटर डिझेल उपलब्धतेची सूचना केली.

राजूरा तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक शेतातच पडून आहे. सुरुवातीला मळणीयंत्रधारक मळणीस तयार नव्हते. त्यानंतर आता त्यांना डिझेलच्या उपलब्धतेची अडचण होत आहे. पंपावर डिझेल देण्यात येत नाही, असा त्यांचा आरोप आहे. 

माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजप नेते संजय उपगन्लावर, विनायक देशमुख यांच्याकडे ही समस्या शेतकऱ्यांनी मांडली. त्यानंतर शिष्टमंडळाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांच्यासमोर हा प्रश्‍न मांडला. शेतकऱ्यांना मळणीकरीता मळणीयंत्रासाठी पेट्रोलपंपावरुन डिझेलची उपलब्धता करावी, अशी मागणी करण्यात आली. 

शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत आमदार मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत २५ लिटर डिझेल देण्यावर निर्णय झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मळणी यंत्राकरिता पेट्रोलपंपधारकांनी २५ लिटर डिझेल देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. काही गावांमध्ये यंत्र असूनही पोलिसांच्या धास्तीमुळे मळणीचालक शेतात येण्यास तयार नाहीत. शेतमाल काढण्यास मजूर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com