Agriculture news in Marathi, chandrashekhar bavankule says that farmers should give preference to the farm pond, nagpur, maharashtra | Agrowon

शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज ः ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व इतर बाबींचा समावेश असतो. पण त्याआधी ग्रामपंचायत स्तरावर शेततळ्यांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे मत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्‍त केले.

महालगाव येथे त्यांच्या उपस्थितीत झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात त्यांनी सरपंच, सचिवांना हे आवाहन केले. या वेळी कामठी विधानसभा प्रमुख रमेश चिकटे, मोबीन पटेल, राजकुमार घुले, सरपंच दीपाल चनेकर, उपसरपंच जिजाबाई निधान, शेषराव वानखेडे, नारायण मुळे, अंताराम ठाकरे, अनिल घोडमारे, भगवान निधान उपस्थित होते. 

नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व इतर बाबींचा समावेश असतो. पण त्याआधी ग्रामपंचायत स्तरावर शेततळ्यांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे मत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्‍त केले.

महालगाव येथे त्यांच्या उपस्थितीत झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात त्यांनी सरपंच, सचिवांना हे आवाहन केले. या वेळी कामठी विधानसभा प्रमुख रमेश चिकटे, मोबीन पटेल, राजकुमार घुले, सरपंच दीपाल चनेकर, उपसरपंच जिजाबाई निधान, शेषराव वानखेडे, नारायण मुळे, अंताराम ठाकरे, अनिल घोडमारे, भगवान निधान उपस्थित होते. 

या वेळी ऊर्जामंत्री यांनी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या. त्यानंतर त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोडवणूकीसाठी पाठविण्यात आल्या. या वेळी महालगाव आणि ११ गावांमध्ये झालेल्या कामांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तहसीलदारांनी शेतकरी सन्मान योजनेविषयी सांगितले. वर्ग दोनची वर्ग एकमध्ये ११ गावांतील १२३२ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. ३६९० नागरिकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. तसेच पालकमंत्री पांदण रस्ते योजनेतून २६ रस्त्यांचे मातीकाम पूर्ण झाले आहे.

गटविकास अधिकाऱ्यांनी कामठी तालुक्‍यात राबविण्यात येणाऱ्या ५२ योजनांची माहिती दिली. सर्वसामान्य जनतेशी निगडित असलेल्या १६०० कुटुंबांना या योजनांचा लाभ मिळत असल्याचे सांगितले. वृक्षलागवडीसाठी ११ गावांत ३४०० रोपे देण्यात आली. नरेगा योजनेतून ३०० विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहेत. सर्व शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा. विम्याचे फक्‍त दोन टक्‍के प्रिमीयम शेतकऱ्याला भरायचे आहे. उर्वरित ९८ टक्‍के शासन भरणार आहे. त्यातून पिकांना संरक्षण मिळणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींनी रेनवॉटर हार्वेस्टिंग करावे, अशी सूचनाही श्री. बावनकुळे यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...