संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीप
ताज्या घडामोडी
चंद्रशेखर भडसावळे यांना मार्टचा ‘फादर ऑफ ॲग्री टुरिझम’ किताब
खडकवासला, जि. पुणे : कृषी पर्यटन संकल्पनेचे प्रणेते कृषिभूषण चंद्रशेखर भडसावळे यांना ‘मार्ट’च्या वतीने ‘फादर ऑफ ॲग्री टुरिझम’ हा किताब देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाच्यावतीने (मार्ट) कृषी पर्यटन परिषद आयोजित केली होती, या वेळी हा पुरस्कार देण्यात आला. रायगड जिल्ह्यातील नेरळ तालुक्यातील सगुणाबाग येथे परिषद आयोजित करण्यात आली होती. शेतकऱ्यांना कृषी पर्यटनात येणाऱ्या अडचणी, तसेच भविष्यातील या व्यवसायाची दिशा यावर या वेळी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

सत्काराला उत्तर देताना भडसावळे म्हणाले, की भूकबळी आणि जागतिक तापमानवाढ ही जगासमोरील मोठी संकटे आहेत, यावर मात करण्यासाठी शेतीपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. तसेच, सगुणा भात तंत्रज्ञानाची माहिती दिली. ‘‘राज्यातील कृषी पर्यटनाचे डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी वेब पोर्टल, सोशल मीडियाचा वापर, तसेच शेती उत्पादन प्रक्रिया व विक्री उद्योगाबाबत मार्ट प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे,’’ असे मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी सांगितले.
‘‘शैक्षणिक क्षेत्रात कृषी पर्यटन अभ्यासक्रमाला सुरुवात केली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे,’’ असे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांनी सांगितले. सातारा, नगर, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड व ठाणे जिल्ह्यातील केंद्रचालक शेतकरी परिषदेत सहभागी झाले होते.
- 1 of 1029
- ››