agriculture news in Marathi, chandrayaan 2 inter in moons orbit, Maharashtra | Agrowon

`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखल

वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीम सफलतेच्या मार्गावर असून ‘चांद्रयान २'ने मंगळवारी चंद्राच्या पहिल्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश केला. ‘इस्रो'च्या शास्त्रज्ञांनी मंगळवारी सकाळी ८.३० ते ९.३० च्या दरम्यान ‘चांद्रयान २'ला चंद्राची LBN#१ या कक्षेत पोचविले. 

नवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीम सफलतेच्या मार्गावर असून ‘चांद्रयान २'ने मंगळवारी चंद्राच्या पहिल्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश केला. ‘इस्रो'च्या शास्त्रज्ञांनी मंगळवारी सकाळी ८.३० ते ९.३० च्या दरम्यान ‘चांद्रयान २'ला चंद्राची LBN#१ या कक्षेत पोचविले. 

‘चांद्रयान २' आता चंद्रापासून किमान ११८ किलोमीटर आणि कमाल १८०७८ किलोमीटर दूर असलेल्या अंडाकृती कक्षेत पुढील २४ तास फिरणार आहे. या दरम्यान चांद्रयानाचा वेग १०.९८ किलोमीटर प्रतिसेकंदावरून कमी करून १.९८ किलोमीटर प्रति सेकंदापर्यंत कमी केला आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येऊन चंद्राशी टक्कर होऊ नये म्हणून हा वेग कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

‘चांद्रयान २'चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे हे ‘इस्रो'च्या शास्त्रज्ञांपुढे आव्हान होते. ७ सप्टेंबरला ‘चांद्रयान २' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. हे ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोचल्याने नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ‘इस्रो'च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. 

हृदयाचे ठोके थांबले ः सिवन 
‘चांद्रयान २'ला चंद्राच्या कक्षेत स्थापन करण्याच्या वेळी आमच्या हृदयाचे ठोके जणू थांबले होते,' अशा शब्दांत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के सिवन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. ‘चांद्रयान २'ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. भारतीय शास्त्रज्ञांच्या या यशस्वी कामगिरीनंतर सिवन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

चंद्रावर स्वारीचे टप्पे 

  • ‘चांद्रयान २' १ सप्टेंबरपर्यंत चंद्राच्या चारही बाजूंनी चार वेळा कक्षा बदलेल 
  • २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते दीड या वेळेत, २८ ऑगस्टला पहाटे साडेपाच ते साडेसहा, ३० ऑगस्ट व १ सप्टेंबरला सायंकाळी सहा ते सात या वेळेत कक्षा बदलली जाईल 
  • २ सप्टेंबर रोजी यानापासून विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर वेगळे होतील 
  • चंद्राभोवती दोन फेऱ्या मारल्यानंतर विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर ७ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल 
  • ‘विक्रम' आणि ‘प्रज्ञान' चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून प्रयोग सुरू करतील 
  • ऑर्बिटर सुमारे एक वर्ष चंद्राला फेऱ्या मारीत संशोधन करेल 
  • चंद्राच्या कक्षेत सर्व बदल केल्यानंतर ऑर्बिटर दोन वर्षे काम करू शकेल एवढे इंधन उरलेले असेल. मात्र ७ सप्टेंबरनंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल.

इतर अॅग्रो विशेष
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...