भाजपचे नेतृत्व असलेले सरकारच महाराष्ट्रात येईल ः चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई  ः भाजपचे १०५ आमदार निवडून आले आहेत. १४ अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपची एकत्रित संख्या ११९ वर जाते. त्यामुळे भाजपला सोबत घेतल्याशिवाय राज्यात सरकार स्थापन होऊ शकत नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच गुरुवारपासून भाजपच्या चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.१५) या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. या चिंतन बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते. या वेळी श्री. पाटील म्हणाले, की भाजपच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या. या तिन्ही बैठकांमध्ये विधानसभेत निवडून आलेले आमदार, अपक्ष आमदार आणि विधान परिषदेतील आमदार यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर नव्याने संघटनात्मक रचनेचे नियोजन झाले. गुरुवारी दुपारनंतर राज्यातील नेत्यांची बैठक पार पडली. या वेळी प्रामुख्याने राजकीय परिस्थितीचे विश्लेषण झाले. गेल्या निवडणुकांमध्ये भाजपने २६० जागा लढवून १२२ जिंकल्या होत्या; तर या वेळी १६४ जागा लढवून १०५ जागा जिंकल्या. हे गुणोत्तर अधिक आहेत. यात सर्वाधिक १२ महिला आमदार भाजपच्या निवडून आल्या आहेत.भाजपचे अनुसूचित जातीचे ९ आमदार आणि अनुसूचित जमातीचे ९ आमदार निवडून आले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत हरलेल्या ५९ जागांपैकी ५५ जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारा पक्ष आहे. तर इतर पक्षातून भाजपत आलेल्या २६ जणांपैकी १६ जण विजयी झाले आहेत, असेही श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. १९९० नंतर एकाही पक्षाला जास्त जागा मिळवता आलेल्या नाहीत. २०१४ आणि २०१९ मध्ये सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीलाही १०० चा आकडाही पार करता आलेला नाही, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com