केळी पीकविम्याचे निकष बदला ः भाजपची मागणी

गारपीट व वादळात नुकसान झालेल्या केळी, रब्बी पिके उत्पादकांना नुकसान भरपाई मिळावी, यंदाच्या अतिपावसात हेक्टरी किमान २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी सोमवारी (ता. ९) भाजपतर्फे शहरात शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला.
Change banana crop insurance criteria: BJP's demand
Change banana crop insurance criteria: BJP's demand

जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी पिकासाठी २०१९-२० या वर्षाप्रमाणे परतावा निकष (मानके) लागू करावीत, कापूस महामंडळ व पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू करावी, मार्च २०२० मध्ये चोपडा, जळगाव, यावल भागात गारपीट व वादळात नुकसान झालेल्या केळी, रब्बी पिके उत्पादकांना नुकसान भरपाई मिळावी, यंदाच्या अतिपावसात हेक्टरी किमान २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी सोमवारी (ता. ९) भाजपतर्फे शहरात शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. माजी मंत्री गिरीश महाजन, जळगावचे खासदार उन्मेष पाटील, रावेरच्या खासदार रक्षा खडसे, आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, संजय सावकारे, किसान सेलचे सुरेश धनके, पोपट भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा परिषदेतील सभापती रवींद्र पाटील, जयपाल बोदडे, जळगाव भाजपचे सरचिटणीस डॉ. राधेश्‍याम चौधरी व इतर नेते, पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले.

जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे, की फळ पीकविमा योजनेत केळी पिकासाठी मानके किंव परतावा निकष २०२०-२१ व पुढील दोन वर्षांसाठी लागू केले आहेत. हे निकष जाचक असून, फक्त विमा कंपनीचा फायदा करण्यासाठी हे निकष लागू केले. ही योजना शेतकऱ्यांसाठी नसून, ती पुढारी, कंपन्यांसाठी तयार केली आहे. तसेच यंदा जिल्ह्यात अतिपावसात कापूस, सोयाबीन, कडधान्य व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. शासनाने जाहीर केलेली भरपाई किंवा मदत तोकडी आहे. तसेच जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये गारपीट, वादळात केळी, मका, गहू, बाजरी आदी पिकांची मोठी हानी झाली. पंचनामे झाले, पण शासनाकडून मदत, नुकसान भरपाई मिळाली नाही. ही भरपाई तातडीने द्यायला हवी. पालकमंत्री यासंदर्भात अपयशी ठरले आहेत. कापूस हंगाम सुरू आहे. कवडीमोल दरात कापसाची खरेदी सुरू आहे. यामुळे पणन महासंघ व इतर यंत्रणांची कापूस  खरेदी लवकर सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com