agriculture news in Marathi change criteria for orange subsidy Maharashtra | Agrowon

संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदला

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी रिंगण पद्धत किंवा दोन्ही बाजूने लॕटरल टाकाव्या लागतात. यावर अधिक खर्च होत असल्याने संत्रा बागायतदारांसाठी ठिबक अनुदान निकषात बदल करावा.

अमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी रिंगण पद्धत किंवा दोन्ही बाजूने लॕटरल टाकाव्या लागतात. यावर अधिक खर्च होत असल्याने संत्रा बागायतदारांसाठी ठिबक अनुदान निकषात बदल करावा, अशी सूचना आमदार देवेंद्र भुयार यांनी केली. 

आमदार देवेंद्र भुयार व आमदार रोहित पवार यांनी कृषी आयुक्त धीरजकुमार यांची भेट घेत संत्रा उत्पादकांचे विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. कृषी विभागस्तरावरील समस्यांच्या सोडण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा, अशी सूचना यावेळी आमदारांकडून करण्यात आली. पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतील २५ व ३० टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळावे, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी रिंगण पद्धतीचा वापर  करावा लागतो.

झाडाच्या खोडाला पाणी लागल्यास कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे ही खबरदारी शेतकरी घेतात. या पद्धतीत ठिबकवरील खर्चात वाढ होते. श्रीराम संत्रा बाग आधारासाठी ठिबक अनुदानात वाढ करावी. २०१९-२० या वर्षात मोर्शी, वरुड तालुक्यात पंधराशे शेतकऱ्यांनी पंतप्रधान सिंचन योजना अंतर्गत ठिबक व तुषार संचाचा लाभ घेतला.

यामध्ये अल्प,. अत्यल्प, एससी, एसटी या शेतकऱ्यांना ५५ टक्के तर मोठ्या शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान मिळाले. ५५ टक्के प्रधान मिळालेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के पूरक तर ४५ टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना तीस टक्के वाढीव अनुदान तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वरुड तालुका कृषी अधिकारी कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. या ठिकाणी कृषी भवन उभारण्यासाठी निधीची तरतूद करावी, असाही मुद्दा मांडण्यात आला. 

विदर्भाचे संत्रा हे मुख्य फळपीक आहे. एक लाख २५ हजार हेक्‍टरवर संत्रा लागवड असून १८ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. वरुड मोर्शी तालुक्यात ८७ हजार हेक्‍टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली आहे. मात्र, या भागात प्रक्रिया उद्योग नसल्याने मिळेल त्या भावात संत्रा विकावा लागतो. परिणामी या भागाकरता संत्रा उद्योग प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
 


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...