दूध भेसळ रोखण्यासाठी फौजदारी कायद्यात बदल

दूध भेसळ रोखण्यासाठी फौजदारी कायद्यात बदल
दूध भेसळ रोखण्यासाठी फौजदारी कायद्यात बदल

मुंबई : राज्यातील भेसळयुक्त दुधाच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारने फौजदारी कायद्यात बदल करण्यास राज्याला परवानगी दिली आहे. त्यानुसार कायद्यात बदल करण्याच्या दृष्टीने विधी विभागाकडून कायदेतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. या कायद्यात सहा महिन्यांपर्यंत असलेली शिक्षेची मर्यादा कमीत कमी तीन वर्षे, तर जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंत करण्याचा विचार होणार आहे. लवकर हा कायदा आणला जाणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी (ता.१३) विधानसभेत दिली.

राज्यात भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याप्रकरणी विधानसभा सदस्य अमित साटम, मनीषा चौधरी, राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री गिरीश बापट म्हणाले, की भेसळयुक्त दुधाची विक्री रोखण्यासाठी फौजदारी संहिता कलम २७२ ते २७६ पर्यंतमध्ये बदल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. केंद्र सरकारने कायद्यातील कलमांच्या शिक्षेमध्ये बदल करण्यास राज्य सरकारला परवानगी दिली आहे. त्यानुसार विधी विभागाच्या कायदेतज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यात येत असून, शिक्षेची मर्यादा वाढविण्याचा त्यातून प्रयत्न केला जाणार आहे. भेसळीच्या संदर्भातील कायद्यातील पळवाट रोखण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. दुधासह खाद्य पदार्थातील भेसळ रोखण्याकरिता प्रयत्न केले जातील. कायद्यातील तरतुदीबदलाच्या दृष्टीने राज्यात १४९ ठिकाणी २४ हजार नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या वेळी चर्चेत बाळासाहेब थोरात, सुभाष साबणे, राहुल कुल, अतुल भातखळकर आदींनी भाग घेतला.

अन्न सुरक्षा व्यवस्थापन राबविणार - राज्यात खाद्य पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी लवकरच अन्न सुरक्षा व्यवस्थापन राबविले जाणार आहे. यामध्ये सर्वांचा समावेश केला जाईल. व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन त्यांना सुरक्षा ठेवण्याचे तंत्र दिले जाईल.

चार मोबाईल व्हॅनची कामगिरी असमाधानकारक - राज्यात अन्न व औषधी प्रशासनाने दुधासह अन्न पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी चार मोबाईल व्हॅन खरेदी केल्या आहेत. परंतु, या मोबाईल व्हॅनव्दारे तपासणी फारशी समाधानकारक झालेली नाही. त्याबद्दल संबंधितांना समज देण्यात येऊन त्यांना नवीन कार्यक्रम आखून दिला जाईल. मुंबईच्या मार्गावरून येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी करण्यात येईल. त्यासाठी अधिक कडक बंधने घालण्यात येतील, असे मंत्री गिरीश बापट यांनी सांगितली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com