अल्पसंख्यांक समाजामुळे सत्ता परिवर्तन ः शरद पवार

Change of power due to minority society ः Sharad Pawar
Change of power due to minority society ः Sharad Pawar

मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने भाजपला मतदान दिले नाही. जे भाजपला हरवू शकतात त्यांना मतदान दिले. अल्पसंख्यांक समाजात एक गोष्ट आहे, ते कुणाला हरवायचं हे ठरवतात. महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाने ठरवलेले कुणाला हरवायचं, म्हणून सत्ता बदल झाला. सेनेबरोबर गेलो कारण तेव्हा सत्ता स्थापन होत नव्हती. तेव्हा मला अल्पसंख्यांक मनातील एक गोष्ट कळली भाजपला सत्तेपासून लांब ठेवा. याची सुरुवात झाली, महाराष्ट्रात सरकार बदलले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा गुरुवार (ता. २३) मुंबईत मेळावा पार पडला. 

या मेळाव्याला शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. या कार्यालयात मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

शरद पवार म्हणाले, आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी हिंदू, ख्रिश्चन, शीख यांच्यासाठी मार्ग खुला केला, पण मुस्लिम बांधवांना नाही. एनआरसी, सीएए याने समाजातील एक वर्ग, विशेष मुस्लिम वर्गाकडे दुर्लक्ष करण्यात आले.

‘दिल्लीतही भाजपला सत्तेपासून दूर ठेवतील’ आपल्याला एकत्र पुढे जायचे आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र ताकद उभी करायची आहे. आज राजस्थान, मध्यप्रदेश गेले, दिल्लीतही भाजपला दूर ठेवतील. लोक आम्हाला सांगतात महाराष्ट्राने रस्ता दाखवला आम्ही त्या वाटेवरून जाऊ. परिवर्तन आणायचे, त्यामध्ये यश मिळेल, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com