agriculture news in Marathi, Change the system of permission of subsidy application, Maharashtra | Agrowon

अनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत बदला: डाॅ. अनिल बोंडे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अनुदान अर्ज पूर्वसंमतीची सध्याची पद्धत बदलण्याचे आदेश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले आहेत.

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अनुदान अर्ज पूर्वसंमतीची सध्याची पद्धत बदलण्याचे आदेश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले आहेत.

राज्य शासनाच्या विविध योजना, निधी आणि शेतकऱ्यांचे अर्जदेखील उपलब्ध असताना निधी पडून राहतोच कसा, असा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शेतकरी अर्ज करतात. त्याला पूर्वसंमती देण्याचे काम अधिकारी वर्गाचे असते. मात्र, अधिकारी वेळेत कामे करीत नसल्याने हा गोंधळ होत असल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’मधून रविवारी (ता. १५) प्रसिद्ध झाले. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी पूर्वसंमती पारंपरिक पद्धत बदलणार असल्याचे स्पष्ट केले.

अनुदान अर्जांना पूर्वसंमती देण्याची सध्याची पद्धत सदोष आहे. अर्जदार शेतकरी ताटकळत बसतात. यामुळे भविष्यात पूर्वसंमती जलद आणि पारदर्शक करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलची मदत घेतली जाईल,’’ असे कृषिमंत्री म्हणाले. शेतकरी मुदतीत अनुदानासाठी अर्ज करतात. मात्र, अधिकारी वर्ग मुदतीत पूर्वसंमती देत नाहीत. या विलंबासाठी विविध कारणे पुढे करून वेळ मारून नेली जाते.  राज्य सरकार या समस्येवर कसा तोडगा काढणार, असे विचारले असता कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी खुलासेवार माहिती दिली.

‘‘शेतकऱ्याने अर्ज केल्यानंतर अनुदानास तो पात्र असल्यास किमान ३० दिवसांच्या आत ऑनलाइन पद्धतीने पूर्वसंमती आपोआप मिळालीच पाहिजे, अशी पद्धत आम्ही सुरू करणार आहोत. पूर्वसंमतीनंतर मोका तपासणीचा मुद्दा येतो. ही तपासणीदेखील १५ दिवसांत करावी व पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यांत अनुदान जमा व्हावे, अशी नवी पद्धत लागू करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या समस्येबाबत पुढील काही दिवसात कामकाजात काही चांगले बदल दिसून येतील,’’ असा दावा डॉ. बोंडे यांनी केला. ‘‘सध्या पूर्वसंमतीअभावी किती अर्ज रखडलेले आहेत, याचा आकडा माझ्याकडे नाही.

मात्र, सर्व अर्जांना मान्यता देण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. अर्थात, या प्रक्रियेत मानवी कामकाजाचा (मॅन्युयल वर्क) समावेश आहे. त्यामुळे आता पूर्वसंमती दिली तरी शेतकरी तातडीने लगेच सर्व कामे करू शकतील, अशी स्थिती नाही. उदाहरणार्थ शेततळे, विहीर खोदाई अशी कामे लगेच होणार नाहीत,’’ असे ते म्हणाले.

“पूर्वसंमती प्रक्रियेत काही बाबी वेळेत झाल्याचे दाखविता येतात. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर किंवा औजारे या बाबी दाखविता येतील. मात्र, पावसाळ्यात शेततळे खोदता येणारच नाही. पावसामुळे ड्रिपदेखील कोणी घेणार नाही किंवा बसविता येणार नाही. पण महाडीबीटीच्या माध्यमातून पूर्वसंमती प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी वाढविण्यात येईल,” असेही ते म्हणाले.

आमदार म्हणून मलाही संघर्ष करावा लागला
योजना व पैसा असूनही शेतकऱ्यांचे अनुदान मागणी अर्ज मंजूर का होत नाहीत, असा मुद्दा उपस्थित केला जात असतो. त्यासाठी मलादेखील आमदार म्हणून संघर्ष करावा लागला. या कामासाठी एक पोर्टल अत्यावश्यक आहे. पोर्टलवर शेतकऱ्याचा आधार, पॅन, सातबारा किंवा इतर कोणतीही अत्यावश्यक माहिती असावी. योजनेसाठी पात्र असल्यास शेतकऱ्याचा अर्ज तात्काळ मंजूर व्हावा, असे माझे म्हणणे होते. आता मात्र ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात राबवून दाखवू, असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.

इतर बातम्या
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...
सोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...
नगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
सातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...
पावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...