agriculture news in Marathi changes in agriculture will be seen step by step Maharashtra | Agrowon

शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने अनुभवाल : भुसे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोचत नाही किंवा विद्यापीठ शास्त्रज्ञ बांधावर येत नाही, अशी सातत्याने ओरड होत होती. यावेळी मात्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसह शास्त्रज्ञांनाही बांधावर जाण्याचे निर्देश देण्यात आले.

नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोचत नाही किंवा विद्यापीठ शास्त्रज्ञ बांधावर येत नाही, अशी सातत्याने ओरड होत होती. यावेळी मात्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसह शास्त्रज्ञांनाही बांधावर जाण्याचे निर्देश देण्यात आले. परिणामी विद्यापीठाची सारी यंत्रणा कृषी सप्ताहाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या शेतावर दिसली राज्याच्या शिवारात असेच सकारात्मक बदल येत्या काळातही अनुभवायला मिळतील, असा विश्‍वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी ‘अ‍ॅग्रोवन’शी बोलताना व्यक्त केला.

कृषिमंत्री दादा भुसे शुक्रवार (ता.३) ते सोमवार (ता.६) असे तीन दिवस पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर होते. या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.

कृषिमंत्री म्हणाले, ‘‘विदर्भाच्या शिवारात बदलासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. पीकपद्धती टप्याटप्याने बदलत भाजीपाला आणि फळबाग लागवडीला प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. हा बदल एकदम होईल, अशी अपेक्षा करणे रास्त ठरणार नाही. टप्याटप्याने हा बदल निश्चित होईल. त्याकरिता प्रयोगशील शेतकरी, कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ, कृषी विभाग यांची मदत घेण्यात येणार आहे. गावागावांत बैठका घेत शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाबाबत प्रसार करण्यावर भर दिला जाईल.’’ 

‘‘कृषी विद्यापीठांनी संशोधनात्मक काम चांगले केले तरीसुद्धा त्यांच्याबाबतीत शेतकऱ्यांमध्ये नकारात्मकता आहे. विद्यापीठाचे कुलगुरू किंवा शास्त्रज्ञ चार भिंतीआड करतात काय? असाच प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मनात सातत्याने राहतो. त्यामुळे कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसह तज्ज्ञांना देखील बांधावर जाण्याच्या सूचना करण्यात आल्या. कृषी सप्ताहापासून याला सुरुवात झाली असली तरी यात सातत्य राहील. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्या संशोधनाला मान्यता दिली तर त्याचा अवलंब अधिक गतीने होते, ही बाब लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला,’’ असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

हळदीला मागणी वाढेल
राज्यात प्लॅस्टिक बॅगप्रमाणे प्लॅस्टिक फुलांवर बंदीची मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच भंडारा, कुमकुम यात रसायनाचा वापर होतो. यावर बंदी लादल्यास राज्यात उत्पादित हळदीला देखील मागणी वाढणार आहे. हे प्रयत्न छोटे असले तरी यातून मोठ्या बदलाची अपेक्षा आम्हाला आहे.


इतर अॅग्रो विशेष
बंदीची प्रक्रिया हवी  सुटसुटीत अन्...केंद्र सरकारने १८ मे रोजी २७ कीडनाशकांच्या बंदीचा...
कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण...पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी...
संपूर्ण नियमनमुक्तीची अंमलबजावणी करापुणे:  सर्वच शेतमालाच्या संपूर्ण...
बाजार समिती कायद्यात बदल करण्याची मागणीपुणे: शेतमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
भाजपच्या दूध आंदोलनापासून ‘संघर्ष समिती...नगर ः दुधाच्या दरासाठी सातत्याने आग्रही राहून...
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु...मुंबई: दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत...
बीटी कपाशी बियाणे अप्रमाणित ...अकोला ः या हंगामात बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या...
'नाबार्ड’चा व्यवस्थापक नसल्यास अग्रणी...पुणे: कृषी पायाभूत निधी योजनेला प्रत्येक...
देशातील जलसंपत्तीची माहिती आता एका...पुणे ः केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील...
भाजीपाला रोपांच्या मागणीत वाढकोल्हापूर: कोविडच्या संकटामुळे थांबलेल्या नव्या...
वऱ्हाडात जोरदार, मराठवाड्यात सर्वदूर...पुणे ः राज्यात पावसाने पुन्हा जोर धरण्यास सुरुवात...
`सीसीआय`कडून सहा कोटी क्विंटल कापूस...नागपूर : कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून (सीसीआय)...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
सदोष बियाण्यांत शेतकरी दोषी कसा? सोयाबीनच्या सदोष बियाण्यांचा विषय यंदा...
बियाणे दहशतवाद गंभीरच!तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...