agriculture news in Marathi changes in committee of sugar factory Maharashtra | Agrowon

कारखाने भाडेतत्त्वावर देणाऱ्या समितीत फेरबदल

मनोज कापडे
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

आजारी साखर कारखाने व त्यांच्या अब्जावधी रुपयांच्या मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत मोठे फेरबदल झाले आहेत.

पुणे : आजारी साखर कारखाने व त्यांच्या अब्जावधी रुपयांच्या मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत मोठे फेरबदल झाले आहेत. समितीचे अध्यक्षपद उपमुख्यमंत्र्यांनी सोडले आहे. प्रधान सचिवांनी देखील या समितीपासून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या तसेच अवसायानात निघालेल्या कारखान्यांची संख्या वाढते आहे. याशिवाय काही कारखान्यांचे सहवीजनिर्मिती प्रकल्प, आसवानी प्रकल्प तसेच इथेनॉल प्रकल्पदेखील अडचणीत आहेत. अडचणीतील कारखाने किंवा इतर प्रकल्पांच्या मालमत्तांची किंमत अब्जावधी रुपयांची आहे. मात्र आजारी कारखान्यांची किंवा प्रकल्प भाडेतत्त्वावर देण्याची धडपड राज्य सरकारकडून सुरू आहे. 

‘‘साखर उद्योगाचा राज्याच्या ग्रामीण विकासात मोठा वाटा असल्याने आजारी कारखाने किंवा प्रकल्प भाडेतत्त्वाने किंवा सहभागीदारी तत्त्वावर चालविण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक आहेत. अर्थात, यासाठी सरकारने नेमलेल्या समितीवर पवार यांचीच अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र ही निवड त्यांना व्यक्तिशः गैरसोयीची वाटत होती. कारण आजारी कारखाना इतरांनी चालविण्यास दिल्यानंतर स्थानिक पातळीवर पुन्हा आरोप-प्रत्यारोप होतात. अशा वेळी विशिष्ट भूमिका घेतल्याचा ठपका समितीच्या अध्यक्षांवर येण्याची शक्यता असते. त्यामुळे पवार यांनी या समितीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला,’’ अशी माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली. 

त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याऐवजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहेत. वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनाही समितीत स्थान देण्यात आले आहे. सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांचे समितीमधील स्थान कायम आहे. 
राज्य सरकारने या समितीची पुनर्रचना करताना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे समिती सचिवपद कायम ठेवले आहे. मात्र सहकार खात्याच्या प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला स्वतःहून बाजूला झाल्या आहेत. अर्थात, राजकीय किंवा प्रशासकीय फेरबदलामुळे समितीच्या मूळ कामकाजावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

‘‘साखर कारखान्यांच्या अब्जावधी रुपयांच्या मालमत्ता भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचे निर्णय महत्त्वाचे पण तितकेच नाजूक असतात. या समितीत सदस्य सदस्य म्हणून साखर आयुक्तांनी काम करणे अपेक्षित आहेत. मात्र समितीचा एखादा निर्णय चुकल्यास किंवा त्याचे पुनरवलोकन करण्याची वेळ आल्यास साखर आयुक्तांचे वरिष्ठ म्हणून प्रधान सचिवांकडे पाहिले जाते. मात्र सचिव देखील त्याच निर्णयाचे भागीदार झाल्यास त्यावर त्रयस्थ म्हणून निर्णय घेणारा उच्चपदस्थ अधिकारीच नव्हता. याकरिता प्रधान सचिवांनी स्वतःहून या समितीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अशी होती जुनी समिती
अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री तर सदस्य म्हणून सहकार व पणन मंत्री, सहकार खात्याचे राज्यमंत्री, सहकार खात्याचे प्रधान सचिव. तसेच सदस्य सचिवपदी साखर आयुक्त असतील.

अशी असेल नवी समिती
अध्यक्षपदी असतील सहकार व पणन मंत्री तर सदस्य म्हणून वित्त, नियोजन, पणन खात्याचे राज्यमंत्री, सहकार खात्याचे राज्यमंत्री. तसेच सदस्य सचिवपदी साखर आयुक्त कायम असतील.


इतर अॅग्रो विशेष
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
संत्र्याची शेतातच लिलावाने विक्री;...परभणी ः जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू)...
नांदेडमध्ये ३४ लाखांचा शेतीमाल घेऊन...नांदेड : शेतीमालाला बाजारात जास्तीचा भाव देतो असे...
राज्यातील मातीत गंधक, जस्त, लोह,...अकोला ः हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या...
जमीन सुपीकता निर्देशांक आता एका क्लिकवरपुणे ः शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी...
शेतकऱ्याची व्याख्या, वर्गीकरणाची गरज ः...पुणे ः शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक धनदांडगे...
टॉवरचा भुलभुलैया, लाखोंचा गंडाकऱ्हाड ः शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा...
आज पुन्हा चर्चा; मंगळवारी भारत बंदनवी दिल्ली ः केंद्राचे तीनही कृषी कायदे...
बुरेवी चक्रीवादळ निवळू लागले; थंडी...पुणे ः बुरेवी चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र...
माती जीवंत ठेवाआज पाच डिसेंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न व...
‘आत्मनिर्भर’ : एक उलटा प्रवासनाणेनिधीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या इकॉनॉमिक...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा ‘...शिवणी (जि. जळगाव) येथील पद्मालय शेतकरी उत्पादक...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...