Agriculture news in Marathi Changes in cropping pattern more beneficial: Vice Chancellor Dr. Spears | Page 2 ||| Agrowon

पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः कुलगुरू डॉ. भाले

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या यांत्रिक पद्धतीचा भक्कम अवलंब, अतांत्रिक सिंचन पद्धतीसोबतच एकच एक पीक पद्धतीच्या शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळण्यात अडसर निर्माण होत आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.

 

अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या यांत्रिक पद्धतीचा भक्कम अवलंब, अतांत्रिक सिंचन पद्धतीसोबतच एकच एक पीक पद्धतीच्या शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळण्यात अडसर निर्माण होत आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी १ ते ७ जुलैदरम्यान कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देखील संपूर्ण विदर्भात आपल्या कार्यक्षेत्रात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन केले होते. सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात मंगळवारी (ता. सात) डॉ. विलास भाले यांच्यासह संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी बार्शीटाकळी तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी गणेश नानोटे यांच्या शेतीला भेट दिली. या वेळी कुलगुरू डॉ. भाले बोलत होते.

डॉ. भाले म्हणाले की, सोयाबीन पिकाची उत्पादकता घटत चालली असून, जमिनीचा पोतसुद्धा बिघडत आहे. पूर्वी ज्याप्रमाणे एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करीत घरापुरता दाळदाना, अन्नधान्य व पैसा मिळवून देणारी पिके शेतकरी पिकवित होते, त्याचप्रमाणे हंगामनिहाय विविध पीकपद्धतींचे नियोजन व त्याला पूरक अशा व्यवसायाची जोड देत फायदेशीर शेतीचे तंत्र कसे अवलंबता येईल. नानोटे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शेतीचे नियोजन केले आहे. त्यांच्या कपाशीच्या शेतात सर्वदूर गांडूळ दिसून येतात. हे अत्यंत समाधानकारक चित्र आहे.

विद्यापीठाच्या कृषी रसायन व मृदशास्त्र विभागाच्या मार्गदर्शनाने शेतातच उपलब्ध पिकांचे अवशेष व काडीकचरा यांचा प्रभावी वापर करत श्री. नानोटे यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढविला असून, कोणत्याही प्रकारच्या रासायनिक निविष्ठांचा वापर टाळत अल्‍पखर्चाचे शाश्‍वत उत्पादन तंत्र अवलंबिले आहे, असे मत संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी मांडले. या वेळी डॉ. मानकर यांनीही मनोगत व्यक्त केले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...