'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल

'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल

नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी ५३४ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यातील परिपूर्ण प्रस्तावांना तीन दिवसांत मंजुरी देऊन छावण्या सुरू करण्यात येणार आहेत. तसेच ''मंडळात एकच छावणी'' हा निकषही बदलण्यात आला आहे. पहिल्या छावणीत जनावरांची संख्या पाचशे झाल्यानंतर त्याच मंडळात पुन्हा दुसरी छावणी सुरू करण्यास मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. 

राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार परिपूर्ण प्रस्तावांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीची मोहर उमटणार आहे. या वर्षी पावसाने हात आखडता घेतल्याने खरिपापाठोपाठच रब्बीचा हंगामही वाया गेला. चाराटंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. पशुधनाचेही छावणीकडे डोळे लागले आहेत. जिल्ह्यात लहान-मोठी एकूण २८ लाख जनावरे आहेत. यांपैकी गाय, बैल, म्हैस या प्रवर्गातील पशुधनाची संख्या तब्बल सतरा लाख एवढी आहे. 

राज्य सरकारने जिल्ह्यातील तब्बल १४२१ गावे दुष्काळी म्हणून घोषित केली. दरम्यान, पशुधनासाठी चारा छावणी सुरू करण्याची मागणी तीव्र होत असल्याचे पाहून, परिस्थितीचा अंदाज घेत राज्य सरकारने त्या सुरू करण्यास मंजुरी दिली. छावणी सुरू करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला. जिल्हाभरातील दहा तालुक्‍यांतून १२ फेब्रुवारीपर्यंत एकूण ५३४ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. यात सर्वाधिक १२९ प्रस्ताव कर्जत तालुक्‍यातून आले.

श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता व अकोले या चार तालुक्‍यांतून एकही प्रस्ताव दाखल नाही. कागदपत्रांची आवश्‍यकता पाहून तहसीलदारांमार्फत हे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आणि त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल होणार आहेत. 

तालुकानिहाय दाखल प्रस्ताव 

नगर ६२, नेवासे २, पारनेर ३९, श्रीगोंदे ६५, कर्जत १२९, जामखेड ८०, पाथर्डी १०३, शेवगाव ४९, राहुरी ४, संगमनेर १

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com