पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल

पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल
पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल

सोलापूर : पंढरपुरात येत्या १२ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेनिमित्त शहर आणि शहराबाहेरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. हा बदल बुधवार (ता. ३) ते १७ जुलै या कालावधीपर्यंत राहील. 

याबाबत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेश जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी शहरात येणारे मार्ग आणि बाहेर जाणारे मार्ग यावरील नियोजन कसे असणार आहे, याची माहिती दिली आहे. या आदेशाची सर्वांनी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी त्यात नमूद केले आहे. 

पंढरपुरात येणाऱ्या वाहनांना सूचना  

यात्रेनिमित्त नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड, (अहल्यादेवी चौक) शेटफळ चौक मार्ग विसावा येथे पार्क करावी. ६५ एकर येथे फक्त दिंडी व पालखीची वाहने पार्क करावी. पुणे, सातारा, वाखरीमार्गे येणारी वाहने कॉलेज क्रॉस चौकीच्या पाठीमागील मैदानात, कराड, आटपाडी, दिघंचीमार्गे येणारी वाहने वेअर हाउस येथे, कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोलामार्गे येणारी वाहने कासेगाव फाटा, टाकळी बायपासमार्गे येऊन टाकळी हायस्कूल व वेअर हाउस येथे पार्क करावी. 

विजापूर, मंगळवेढामार्गे येणारी वाहने टाकळीमार्गे वेअर हाउस व यमाई तुकाई मंदिर व बिडारी बंगला सेशन कोर्टशेजारी पार्किंग करावी. यात्रा कालावधीत शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण, गजानन महाराज मठ, नगरपालिका पार्किंग, क्रीडा संकुल, सखूबाई पार्किंग, संबंधित मठामध्ये पार्क होतील. इतर वाहने जुन्या कराड नाक्यासमोरील रेल्वे मैदान व मार्केट यार्ड येथे पार्क करतील. त्याचबरोबर शहरातील अंतर्गत रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी गाड्या पार्क करण्यास मनाई असेल.

पंढरपुरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांबाबत सूचना  

पंढरपूर शहरातून टेंभुर्णी, नगर, सोलापूर, लातूरकडे जाणारी वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, करकंब चौकमार्गे जातील. पुणे - साताऱ्याकडे जाणारी वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, वाखरीमार्गे जातील. विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढामार्गे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक, गादेगाव फाट्यापासून जातील.

पंढरपुरातील अंतर्गत वाहतुकीबाबत  

प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार चौक ते शिवाजी चौक, सावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. बार्शी, सोलापूर मार्गांवरून येणारी हलकी वाहने तीन रस्ता, अहल्यादेवी चौक, नवीन पुलामार्गे नगरपालिकेच्या वाहनतळावर जातील.

नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या एस. टी. बसेसना जुना दगडी पूल व तीन रस्ता मार्ग बंद असेल. त्याचबरोबर मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक या मार्गाने येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे. अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक, सावरकर चौक ते अर्बन बँक, भक्तिमार्ग ते काळा मारुती चौक, लहुजी वस्ताद चौक ते काळा मारुती चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com