agriculture news in marathi, charactristicks of breeding buck | Agrowon

शेळीपालनातील पैदाशीच्या नराचे महत्त्व
के. एल. जगताप
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल.

यशस्वी शेळीपालनासाठी जातिवंत शेळ्या अाणि नराची निवड याला अधिक महत्त्व अाहे. शेळीपालनाचे आर्थिक गणित शेळ्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. अापल्या भागातील वातावरण अाणि भाैगोलिक परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या जातींची निवड करावी. शेळीची व नराची निवड करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल.

यशस्वी शेळीपालनासाठी जातिवंत शेळ्या अाणि नराची निवड याला अधिक महत्त्व अाहे. शेळीपालनाचे आर्थिक गणित शेळ्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. अापल्या भागातील वातावरण अाणि भाैगोलिक परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या जातींची निवड करावी. शेळीची व नराची निवड करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

शेळीची निवड
उत्तम दुग्धोत्पादन असणाऱ्या माद्या कळपात निर्माण झाल्याने जास्त वजनाची करडे विक्रीसाठी उपलब्ध होतात.

  • पशुतज्ज्ञाच्या मार्गदर्शनानेच शेळ्यांची खरेदी करावी.
  • साधारणपणे एक वेत झालेल्या शेळीची निवड करावी. यावरूनच सर्व इतर गुणधर्माविषयी माहिती मिळेल. उदा. करडांची संख्या, दूध उत्पादन, आजार, वर्तणूक इ.
  • शेळीची वंशावळ पाहून खरेदी केल्यास उत्तम. तिची आई जुळी करडे देणारी असावी.
  • शेळीचे वय, करडांची संख्या तसेच दूध देण्याचे प्रमाण या बाबी तपासाव्यात.
  • शेळी चपळ, आकाराने मोठी, केस मऊ व चमकदार असावेत.
  • दुभती शेळी असेल तर तिची कास पाहून, दूध काढून पाहणे महत्त्वाचे आहे.
  • तोंडापासून ते शेपटीपर्यंत शेळी लांब, सरळ असावी.

पैदाशीचा नर निवडताना
जातिवंत नरामुळे उत्तम अनुवंश कळपात तयार होतो. कळपातील गर्भधारणेचे व जुळे व तिळे करडे देण्याचे प्रमाण वाढते. पुढील पिढ्यांची उत्पादन क्षमता, प्रजोत्पादन क्षमता चांगली ठेवली जाते.

  • पैदाशीचा नर चपळ अाणि दोन जुळ्या नरांपैकी असावा. त्यामुळे पुढील पिढी चांगली करडांची संख्या देणारी निपजेल.
  • कळपामध्ये सुदृढ व त्या त्या जातीचे गुणधर्म दर्शविणारा नर असावा.
  • कोणतेही शारीरिक व्यंग नसावे.
  • दिसायला उंच, लांब असावा. मानेवर सिंहासारखे आयाळ असावे.
  • नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी.

संपर्क ः के. एल. जगताप, ९८८१५३४१४७
(विषय विषेशज्ञ, पशू संवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, जि. बीड)

इतर कृषिपूरक
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...