agriculture news in marathi Charging of interest on crop loan | Agrowon

पीक कर्जावरील व्याज आकारणी

अनिल महादार
शनिवार, 25 एप्रिल 2020

वेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३ टक्के अतिरिक्त व्याज सवलत दिली जाते. म्हणजे कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून किंवा शेतकऱ्यांनी परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत किंवा बँकांनी परतफेड करण्यासाठी निश्चित केलेल्या तारखेपर्यंत कर्ज, त्यांपैकी जे आधी असेल, त्या वितरणाच्या तारखेपासून जास्तीत जास्त एका वर्षाच्या अधीन असतील. याचा अर्थ असा होतो की वरील प्रमाणे त्वरित परतफेड करणाऱ्यांना सन २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षात प्रतिवर्षी अल्प मुदत कर्ज ४ टक्के व्याजदराने मिळेल

वेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३ टक्के अतिरिक्त व्याज सवलत दिली जाते. म्हणजे कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून किंवा शेतकऱ्यांनी परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत किंवा बँकांनी परतफेड करण्यासाठी निश्चित केलेल्या तारखेपर्यंत कर्ज, त्यांपैकी जे आधी असेल, त्या वितरणाच्या तारखेपासून जास्तीत जास्त एका वर्षाच्या अधीन असतील. याचा अर्थ असा होतो की वरील प्रमाणे त्वरित परतफेड करणाऱ्यांना सन २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षात प्रतिवर्षी अल्प मुदत कर्ज ४ टक्के व्याजदराने मिळेल

“सुदामा केव्हा आलास?” दाजींनी घरात येताच विचारले. सुदामा म्हणाला, ‘‘हे काय आताच आलो. चहा-पाणी पण झाले. तुमच्या शेतीच्या ख्याती सगळ्या पंचक्रोशीमध्ये पसरली आहे. म्हणून आलोय खास वेळ काढून ती बघायला.``

दाजींनी घरात जेवणाचा फक्कड बेत करण्यास सांगितले आणि म्हणाले, `` सुदामा, तू आराम कर. मी शेतावर जाऊन लोकांना कामाचे नियोजन देऊन येतो. थोडं बँकेतही काम आहे, येतो तासाभरात उरकून. मग जेवण झाल्यानंतर आरामात शेत बघायला जाऊ.`` यावर सुदामा म्हणाला, तसं कशाला मी पण आताच येतो की तुमच्याबरोबर. अडचण नाय ना होणार माझी. नाही नाही अडचण कशाची, तुला दोन फेऱ्या नको म्हणून म्हटलो होतो, दाजी म्हणाले.

सुदामाला बरोबर घेऊन शेतावर आले. दाजींनी शेताची केलेली रचना सांगितली. नवीन लागवड काय केली, ते सांगितले. ``चार एकर ऊस ,पॉलीहाऊस हे तर तुला माहीत आहेच. या वर्षी बटाटे केल्यानंतर तिथे कलिंगड लावले आहे. माळावर दोन एकर नवीन क्षेत्र तयार केले. तिथे दोन एकर सीताफळ लागवड केली. गावाशेजारच्या क्षेत्रात गहू, हरभरा आहेच. जवळजवळ सर्वच क्षेत्र ठिबक खाली आणले आहे. `` दाजी अभिमानाने सांगत होते. त्याकडे बघितल्यावर सुदामाला दाजींचे कौतुक वाटले. वास्तविक सुदामाकडेही संपूर्ण बागायती क्षेत्र असून, बहुतांश सर्व लागवड उसाची केली आहे. मात्र, उसामध्ये वर्षापेक्षा अधिक काळ शेती अडकून पडते. तुलनेने विचार करता उसाचे उत्पादन आणि कारखान्यांचे दर यांची काही सांगड बसत नसल्याचे सुदामाला जाणवत होते. त्याच्याही मनात ऊस थोडा कमी करून त्या जागी नवीन कोणतेतरी पीक घेण्याचा विचार होता. म्हणून तर दाजींकडे चर्चा करण्यासाठी तो आला होता. परिसरामध्ये दाजींची प्रगतिशील शेतकरी म्हणून ख्याती होती.

शेतीमध्ये फेरफटका मारून सर्व मजुरांच्या कामाचे नियोजन झाल्यानंतर बँकेकडे त्यांची गाडी वळवली. बँकेत गर्दी असली तरी आतील कृषी अधिकाऱ्यांनी दाजींना ओळख दाखवली. मात्र, जेवणासाठी घरातील सारे खोळंबले असतील, या विचाराने गर्दी टाळण्यासाठी त्यांनी एटीएममधून आवश्यक ते पैसे काढून घरी आले. जेवण झाल्यावर सुदामाने मनातल्या शंका विचारल्या. तो म्हणाला ,`` दाजी, तुम्हाला हे नवीन प्रयोग कसे सुचतात? ” दाजी हसले आणि म्हणाले, “ चांगल्या शेतकऱ्यांच्या संपर्कात असतो मी, अॅग्रोवनचे वाचन, कृषी मासिके या बरोबरच कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात कायम राहतो. नवीन तंत्रे, गोष्टी, पिके याविषयी माहिती कळत राहते. ती समजून घेतो आणि शेतामध्ये करायचा प्रयत्न करतो. आज सारे गाव माझं कौतुक करतंय खरं, पण एकेकाळी खुळ्यावानी काही करतो असंच म्हणायचे सारे. `` त्यावर सुदामा म्हणाला, ``एवढे प्रयोग करायला पैसे लागतात, त्याची तजवीज कशी करता? आमचं घोडं तर तिथंच पेंड खातंय!``

आता आपल्याला बँकेमध्ये ज्यांनी हात केला ना, त्या बँकेच्या कृषि अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन असते. वेगवेगळ्या योजना, नव्या पत पुरवठ्याच्या गोष्टी त्यांच्यामुळे तर मला समजल्या. आज माझ्यावर ३ लाख रुपये पीक कर्ज आहे. पॉलीहाऊस आणि ट्रॅक्टरचे मुदत कर्ज आहे. ठिबकचेही कर्ज आहे. पण सर्वांची परतफेड योग्य पद्धतीने नियोजनाप्रमाणे सुरू आहे. आता आपण एटीएम मधून जे पैसे काढले ते पीक कर्जातून. बँकेने किसान क्रेडिट कार्ड हे `रुपे कार्ड` दिले आहे. या आपण ३ लाख रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतो किंवा या कार्ड द्वारे खत, बी बियाणे, कीडनाशके यांची खरेदी करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या पीक कर्जाला व्याज दर फक्त ७ टक्के आहे. त्याची नियमित परतफेड करणाऱ्याला २ टक्के अनुदान परतावाही शासनाकडून मिळतो. म्हणजे व्याज पडते केवळ पाच टक्के. आणखीही काही सवलती मिळत राहतात.``

यावर सुदामा म्हणाला ,`` माझेही गावातील सोसायटीकडून घेतलेले ३ लाख रुपयांचे पीक कर्ज आहे. त्यालाही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे व्याज दर हा ६ टक्के आहे व त्यातील २ टक्के शासन देते. म्हणजे प्रत्यक्षात ४ टक्के व्याज दर पडतो. सोसायटीसुद्धा कर्ज वेळेत भरले तर व्याज दरात सवलतही देते.” पुढे तो म्हणाला ,`` मी काही मध्यम मुदत कर्ज घेतले नाही. तुमची बँक मध्यम मुदतीचे कर्जाच्या व्याजाची आकारणी कशी करते?``
दाजींनी मग सुदामाला मध्यम मुदतीच्या कर्जाच्या व्याजाची आकारणी कशी असते, हे समजावून सांगितले.

  • मध्यम मुदतीच्या कर्जास सरळ व्याज पद्धतीने व्याज आकारले जाते.
  • कर्जाचा हप्ता व व्याज एकत्र भरवायचे असते.
  • कर्जाच्या मुद्दलाचे समान हप्ते असतात. जसजसे कर्जाचे हफ्ते भरत जातात, तशी व्याज आकारणी कमी होत जाते.
  • कर्जाचा हप्ता व व्याज वेळेत भरले नाही तर मात्र व्याजावर व्याज आकारले जाते. त्यास चक्रवाढ व्याज म्हणतात.

पीक कर्ज व त्याचे सध्याचे व्याज दर
राष्ट्रीयकृत बँक 

रु. ३.०० लाख पर्यंत ७ टक्के दरसाल पीक कर्जाच्या मुदतीपर्यंत.

जिल्हा मध्यवर्ती बँक

  • बँक ते सोसायटीला ४ टक्के दरसाल या प्रमाणे लहान व मोठ्या शेतकऱ्यांसाठी,
  • सोसायटी ते सभासद शेतकरी ६ टक्के दरसाल.

व्याज दर सवलत 
रिजर्व बँक ऑफ इंडिया यांच्या कडून व्याजदराची सवलत ( Interest Subvention ) २ टक्के दरसाल.

टीप 

  • दोन टक्के व्याज सवलत ( सबवेंशन) कर्जाच्या रकमेवर त्याच्या वितरणाच्या तारखेपासून किंवा कर्जदाराच्या वास्तविक परतफेड तारखेपासून किंवा बँकांनी निश्चित केलेल्या कर्जाच्या निश्चित तारखेपर्यंत मोजले जाते. जास्तीत जास्त एका वर्षाच्या अधीन.
  • वेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३ टक्के अतिरिक्त व्याज सवलत दिली जाते. म्हणजे कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून किंवा शेतकऱ्यांनी परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत किंवा बँकांनी परतफेड करण्यासाठी निश्चित केलेल्या तारखेपर्यंत कर्ज, त्यांपैकी जे आधी असेल, त्या वितरणाच्या तारखेपासून जास्तीत जास्त एका वर्षाच्या अधीन असतील. याचा अर्थ असा होतो की वरील प्रमाणे त्वरित परतफेड करणाऱ्यांना सन २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षात प्रतिवर्षी अल्प मुदत कर्ज ४ टक्के व्याजदराने मिळेल

संपर्क- अनिल महादार, ८८०६००२०११
(निवृत्त सहायक महाप्रबंधक, बॅंक ऑफ इंडिया) 


इतर कृषी शिक्षण
कृषी विद्यार्थी पोहोचविताहेत नवे तंत्रपुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर...
कृषीकन्या सांगताहेत जमीन सुपिकतेचे फायदेमाळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयातील...
मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी गाईतील...दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे...
मध्यपूर्व प्रदेशातील पावसात ४० टक्के घटविविध प्रारूपाद्वारे मध्यपूर्वेतील पावसाच्या...
सूक्ष्म अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया...मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
कृषी पदवीच्या परीक्षांचा कृती आराखडा...अकोला/नाशिक ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पीक कर्जावरील व्याज आकारणीवेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
पीक अवस्थेनुसार जाणून घ्या तापमानमहाराष्ट्र राज्य हे भौगोलिक क्षेत्रानुसार देशात...
पाण्याचे महत्त्व जाणून संवर्धनासाठी...जागतिक हवामान संघटनेने २०२० हे वर्ष ‘जागतिक...
पूर्व विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात...महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावरील हवेचा दाब कमी होत...
दुधापासून व्होडका होतेय अमेरिकेत...दूध हे तुलनेने फारच कमी काळासाठी टिकवून ठेवता...
नत्रयुक्त खतांचा वापर व्हावा अधिक...पर्यावरण आणि हरितगृह वायू म्हटले की आपल्याला...