agriculture news in marathi, Charity institutions hold up three thousand marriages | Agrowon

धर्मादाय संस्थांकडून यंदा तीन हजार विवाह
हरी तुगावकर
सोमवार, 14 मे 2018

लातूर : ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्याअभावी कुटुंबातील मंगलकार्य हे एक दडपणच असते. आपत्यांच्या लग्न चिंतेने कुटुंबीय अस्वस्थ असतात, अशाच सुधारणावादी विचारसरणीतून पुढे आलेले विचार लग्नसोहळ्यास एक उच्च दर्जा प्राप्त करून देतात. सामुदायिक विवाह सोहळे हा त्यातीलच एक महत्त्वपूर्ण उपक्रम. या उपक्रमांना राज्यातील धर्मादाय संस्थांनीही साथ दिल्यानंतर सामाजिक आणि आर्थिक ताण कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.

लातूर : ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्याअभावी कुटुंबातील मंगलकार्य हे एक दडपणच असते. आपत्यांच्या लग्न चिंतेने कुटुंबीय अस्वस्थ असतात, अशाच सुधारणावादी विचारसरणीतून पुढे आलेले विचार लग्नसोहळ्यास एक उच्च दर्जा प्राप्त करून देतात. सामुदायिक विवाह सोहळे हा त्यातीलच एक महत्त्वपूर्ण उपक्रम. या उपक्रमांना राज्यातील धर्मादाय संस्थांनीही साथ दिल्यानंतर सामाजिक आणि आर्थिक ताण कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.

राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून यंदा राज्यभर सामूहिक विवाह सोहळे झाले. यात तीन हजार ४६ लेकींचे कन्यादान करण्यात आले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदच असे घडले. जात, धर्माच्या पलीकडे जाऊन या सोहळ्यांनी सामाजिक सलोखा जपत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

संस्थांचा पैसा काढला बाहेर
अनेक धार्मिक, धर्मादाय संस्थांकडे पैसा पडून आहे, हे श्री. डिगे यांच्या लक्षात आले. या पैशाचा योग्य वापरासाठी त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना अमलात आणली. दोन जिल्हे वगळता प्रत्येक जिल्ह्यात असे सोहळे पार पडले. सर्व व्यवस्था संस्थांनी केली. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन अशा सर्व धर्मांतील मुला-मुलींचे लग्न लावून सामाजिक सलोखा जपण्यात आला. अभिनेत्यांपासून ते नेत्यापर्यंत सर्वांनी या सोहळयांना हजेरी लावली.

गरीबांचे २०० कोटी वाचले
गरीब कुटुंबातील लग्न म्हटले तरी वधू-वरांच्या दोन्ही बाजूने किमान पाच-सात लाख रुपये खर्च येतो. येथे तर तीन हजार ४६ जोडप्यांचे लग्न लावण्यात आले. एक पैशाचाही खर्च वधू-वरांना आला नाही. यातून राज्यभरातील गरीब कुटुंबांतील या लग्नाच्या खर्चाचे किमान २०० कोटी रुपये वाचले आहेत. हे या सोहळ्यांचे यश आहे.

३०० क्विंटल धान्याची नासाडी वाचली
लग्न म्हटले की अक्षता आल्याच. प्रत्येक लग्नात किमान दहा किलो तरी धान्यापासून अक्षता तयार केल्या जातात. एक प्रकारे ती नासाडीच असते. पण या सोहळ्यात त्याला फाटा देण्यात आला. अक्षता म्हणून सर्वांना फुले देण्यात आली. यातून ३०० क्विंटल धान्याची होणारी नासाडी मात्र वाचली आहे.

गरीब, शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आपल्या आपत्त्यांच्या लग्नाची चिंता वाटत असते. या सोहळ्यामुळे धर्मादाय संस्थाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. मदतीसाठी हजारो हात पुढे आले. घरचे कार्य म्हणून सर्वांनी काम केले. अवघ्या दीड महिन्यात तीन हजार लग्न लावण्यात यश आले. या पुढेही असेच उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
- शिवकुमार डिगे, राज्य धर्मादाय आयुक्त.

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...