जळगावात ज्वारी खरेदीसाठी स्वस्त धान्य दुकानदारांचा बारदाना वापरणार

जळगाव : जिल्ह्यात भरडधान्याच्या साठवणुकीसाठी किमान दोन लाख बारदानाची आवश्‍यकता आहे. परंतु, लॉकडाउनमुळे इतक्‍या मोठ्या प्रमाणावर बारदाना आणण्यात अडचणी येण्याची शक्‍यता लक्षात आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांकडील बारदाना शासकीय केंद्रात धान्य खरेदीसाठी देण्यात येईल. बाजारात मक्‍याचे दर कमी आहेत. त्यामुळे केंद्रात मका विक्रीसंबंधी शेतकऱ्यांचा ऑनलाइन नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे ११०० शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती आहे.
Cheap to buy sorghum in Jalgaon Grain shopkeepers will use the bardana

जळगाव जिल्ह्यात एकूण केंद्रांना भरडधान्य खरेदीसाठी मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी तातडीने या सर्व केंद्रांना मंजुरी दिली. प्रत्येक तालुक्‍यात किमान एक केंद्र मंजूर करण्यात आले. 

या केंद्रांवर खरेदी करण्यात येणारे भरडधान्य साठवणुकीसाठी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दोन लाख बारदानाची (गोण्या) मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतक्‍या मोठ्या संख्येने बारदान उपलब्धतेचा प्रश्न प्रशासनापुढे होता.

तथापि, ढाकणे यांनी या प्रश्नांची सोडवणूक करीत स्वस्त धान्य दुकानदारांकडे जो बारदाना उपलब्ध आहे, तोच शासकीय खरेदी केंद्रात उपलब्ध करून घेण्याची भूमिका घेतली. त्याबाबत आदेशही जारी केले. लागलीच बारदाना उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू झाली. जिल्ह्यात एकूण १९३८ स्वस्त धान्य दुकानदार असून त्यांच्याकडून बारदाना उपलब्ध होणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com