agriculture news in marathi, cheating of banana growers, jalgaon, maharashtra | Agrowon

केळी उत्पादकांची तीन वर्षांत दोनशे कोटींची फसवणूक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

बाजार समित्यांकडून चूक झाली म्हणून फसवणुकीचे प्रकार घडले. काही जण नामदार म्हणून बाजार समित्यांमध्ये काम करतात. माझी दोनदा केळी खरेदीत फसवणूक झाली. मध्यंतरी तांदलवाडी, निंबोलच्या शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा केळी खरेदीदारांनी घातला. बाजार समितीला याचे काहीएक देणेघेणे नाही. ते सरळ हात वर करतात; मग जो शेतमालाचा व्यापार सुरू असतो, त्यावर नियंत्रण कुणाचे? हा प्रश्‍न आहे.
- अतुल मधुकर पाटील, केळी उत्पादक, केऱ्हाळे बुद्रुक, ता. रावेर, जि. जळगाव.

जळगाव   ः जिल्ह्यात बिगर परवानाधारक केळी खरेदीदारांनी मागील तीन वर्षांत शेतकऱ्यांची जवळपास २०० कोटींची फसवणूक केली आहे. या प्रकरणांमध्ये पोलिसात तक्रारी आहेत; पण तपास पुढे सरकून कुणालाही न्याय मिळालेला नाही. गावोगावी केळी खरेदीदारांचा सुळसुळाट आहे. बाजार समित्यांकडे त्याची कोणतीही नोंद नसते. बाजार समितीचा डोळा फक्त सेवाशुल्क व इतर शुल्कावर असतो. जर फसवणूक झाली तर सर्वच बाजार समित्या हात वर करीत असल्याचा प्रकार जिल्ह्यात  राजरोस सुरू आहे.

जिल्ह्यात उत्तर व मध्य भारतासह स्थानिक व्यापारी केळीची खरेदी करतात; परंतु अनेक व्यापारी नोंदणीकृतच नसतात. त्यांची कोणतीही नोंद बाजार समितीकडे नसते. कारण जर केळीचा व्यापार करायचा असला तर नोंदणीची सक्ती, नोंदणीसंबंधीची ठोस यंत्रणा जिल्ह्यातील कुठल्याही बाजार समितीकडे नाही. केळीची खेडा खरेदी केली जाते. बाजार समितीत आवक नसते. व्यापारी येतो, थेट खरेदी करतो. दोन - चार व्यवहारांसंबंधी सचोटी दाखवितो, नंतर फसवणूक करून गाशा गुंडाळून पळून जातो. हे असे प्रकार मागील तीन वर्षांत रावेर, चोपडा, जळगाव, यावल, मुक्ताईनगर, जामनेर भागात घडले.

जे व्यापारी खरेदी करतात, ते पावती देतात. पण त्यावर परवाना क्रमांक, संपर्काची सविस्तर माहिती (पत्ता, क्रमांक वगैरे), बाजार समितीशी संबंधित संपर्क आदी कोणतीही माहिती नसते. ते पळून गेल्यावर त्यांचे जे मोबाईल क्रमांक असतात, ते बंद होतात. पोलिसात तक्रार केली तर आठ दिवस तपास केला जातो. मग नंतर काहीएक कारवाई होताना दिसत नाही. सुमारे २०० कोटींची फसवणूक मागील तीन वर्षांत झाली. पण एकाही प्रकरणाचा तपास झालेला नाही.

रावेर तालुक्‍यातील केऱ्हाळे, तांदलवाडी, निंबोल, ऐनपूर, खिर्डी, यावलमधील साकळी, वड्री, भालोद भागातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. चोपडा तालुक्‍यातील वढोदा, विटनेर, गोरगावले बुद्रुक भागातही फसवणुकीचे प्रकार घडले; पण न्याय कुण्या शेतकऱ्याला मिळाला नाही.

बाजार समितीचा फक्त शुल्कावर डोळा
जिल्ह्यात जी खेडा खरेदी केळीची केली जाते, त्यासंबंधी गत वर्षी किंवा गत काळात बाजार समितीने व्यापाऱ्यांकडून सेवा व इतर शुल्काच्या नावाखाली पैसे आकारले. ही आकारणी व्यापाऱ्याकडून केली. शेतकऱ्याकडून कोणतेही शुल्क घेतले नाही. हे शुल्क आकारले, पण ते कुणाकडून आकारले, संबंधितांची सविस्तर माहिती बाजार समितीकडे कशी उपलब्ध नाही.

कारण ज्यांच्याकडून आपण शुल्क घेतो, त्याचा पत्ता, सविस्तर माहिती, अनामत रक्कम बाजार समितीकडे जमा असायलाच हवी. ही अनामत रक्कम २० लाखांवर किमान असावी. कारण फसवणूक झाल्यानंतर संबंधित रकमेतून शेतकऱ्यांचे पैसे अदा करता येतील. नंतर कारवाई, तपास करता येईल व व्यापारीही फसवणूक करण्यापूर्वी नक्कीच विचार करतील, असा  मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
शाश्‍वत पर्यायी पीक ः बांबूनिसर्ग चक्र बदलत चालले आहे. आतापर्यंत आपण रेल्वे...
‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींगकोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर...
अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून...अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या...
लाच घेताना कृषी विद्यापीठातील लिपिकाला...नगर : कोरोना पुणे सेवानिवृत्तीची कागदपत्रे...
राज्यात पीक नुकसान ५० लाख हेक्टरच्या...पुणे: राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा...
जुन्या निकषांनुसार कामाला विमा...जळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचेजालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या...
पावसामुळे शेतीकामात अडथळे पुणे ः परतीच्या पावसाचा दणका अजूनही सुरूच आहे....
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय...
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...